Pune Cybercrime News: पुण्यातील जिल्हाधिकाऱ्यांचा मेसेज आलाय? सावधान! अन्यथा खातं होईल रिकामं

पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यासोबत दुसऱ्यांदा अशा प्रकारची घटना घडली आहे.
Pune Cybercrime News
Pune Cybercrime NewsSaam TV
Published On: 

Collector of Pune: राज्यात सायबर चोरट्यांचा सुळसूळाट सुरु आहे. मोठमोठ्या अधिकाऱ्यांवर सायबर चोरट्यांची करडी नजर असल्याचं दिसतंय. गेल्याच महिन्यात आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांच्या नावाचे फेक फेसबूक अकाऊंट बनवण्यात आले होते. अशात आता पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यासोबत दुसऱ्यांदा अशा प्रकारची घटना घडली आहे. (Latest Crime News)

पुण्याचे (Pune) जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांच्या नावे बनावट फेसबूक अकाऊंट तयार करण्यात आले आहे. डॉ. राजेश देशमुख यांचे फोटो वापरत मागील महिन्यात "माही वर्मा" या नावाने फेसबूक अकाऊंट तयार करण्यात आले होते. त्या प्रकरणी पोलिसांनी तपास करत आरोपींच्या मुसक्या आवळल्या होत्या. अशात आता पुन्हा एकदा देशमुख यांचे नाव वापरून बनावट फेसबूक अकाऊंट तयार केल्याचा प्रकार समोर आला आहे.

Pune Cybercrime News
Sillod Crime News: मामाने मुलगी दिली नाही म्हणून भाच्याने केलं भयानक कांड; सिल्लोड तालुक्यातील धक्कादायक घटना

यापूर्वी देखील त्यांच्या नावे ४ ते ५ बनावट फेसबूक अकाऊंट तयार करण्यात आले होते. तसेच त्यांच्या मित्र परिवारातील अनेक जणांना "रिक्वेस्ट" सुद्धा पाठवण्यात आल्या होत्या. सदर घटनेसंदर्भात राजेश देशमुख यांनी सायबर पोलिसांना याबाबतची माहिती दिली आहे. फेसबूकवर (Facebook Account) माझ्या नावाने तयार करण्यात आलेले अकाउंट माझे नसून कुठल्या ही प्रकारच्या फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारू नका, असं आवाहन स्वतः देशमुख यांनी केलं आहे.

बनावट बदली आदेश प्रकरणी महिला पोलिसाच्या पतीला अटक

गडचिरोली पोलीस दलात कार्यरत एका महिला अंमलदाराच्या पतीने थेट गृह विभाग सहसचिवांच्या नावे बनावट बदली आदेश तयार करून पोलीस अधीक्षकांना पाठवले. या प्रकरणाचा उलगडा झाला असून महिला पोलीस मीनाक्षी यांचा पती संदीप याला अटक केली आहे.

Pune Cybercrime News
Mumbai Crime News: आईवरून चिडवताच तळपायाची आग मस्तकात गेली; ४३ वर्षीय व्यक्तीची मुलाने केली हत्या

एक महिन्यापूर्वी संदीप मड्डेलवार याने राज्याच्या गृह विभाग सहसचिवांची स्वाक्षरी असलेला इ-मेल पोलीस अधीक्षकांना पाठवत दोन अंमलदारांची बदली झाल्याचे कळविले होते. अंमलदाराची बदली गृह विभाग करत नसल्याने पोलिस अधीक्षकांना शंका आली. त्यांनी तपास सायबरकडे सोपवून प्रकरणाचा तपास करण्याच्या सूचना दिल्या. तपासात आदेश बनावट असल्याचे स्थानिक गुन्हे शाखेने उघडकीस आणल्याने संदीप मड्डेलवार याला अटक करण्यात आली आहे. यात महिला पोलीस मीनाक्षी पोरेड्डीवार यांचाही सहभाग होता का याचा तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.