

पुण्यातील मावळमध्ये एकाच आठवड्यात दोन हत्या
वडगाव आणि तळेगावमधील हत्येच्या घटनेने खळबळ
गुन्हेगारांवर कडक कारवाईची मागणी
पुण्यात गुन्हेगारीचे सत्र सुरूच असल्याचे पाहायला मिळत आहे. पुण्यात एकाच आठवड्यात दोन ठिकाणी हत्या झाल्याची घटना घडली. पुण्यातील वडगावमध्ये चारित्र्याच्या संशयातून पत्नीचा खून झाल्याची घटना घडली. तर तळेगावमध्ये पुतण्याने काकाचा जीव घेतल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या दोन्ही घटनेने पुण्याच्या मावळमधील नागरिक दहशतीत आहेत.
पुण्याच्या मावळमधील वडगावमध्ये एका विवाहित महिलेच्या हत्येची घटना घडली. चारित्र्यावर संशय घेत पतीनेच पत्नीची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. सोनाली विनोद कणसे असे ३५ वर्षीय महिलेचे नाव आहे. विनोद हा पत्नीवर वारंवार चरित्राच्या संशयाहून मारहाण करायचा. विनोदने संतापाच्या भरात तीष्ण हत्यारांनी डोके, छाती, शरीराच्या इतर भागावर जबर मारहाण केली. या मारहाणीत सोनाली कणसे यांचा जागीच मृत्यू झालाय.
तर दुसरी घटना 27 एप्रिल रोजी घडली. तळेगाव दाभाडेमधील जाधववाडी गावात जमिनीच्या वादातून एका व्यक्तीची हत्या झाली. या प्रकरणात पुतण्यानेच त्याच्या काकावर कोयत्याने वार करून हत्या केली. मृत व्यक्तीचे नाव रवी जाधव असे आहे. तर पुतण्याचे नाव सुखदेव जाधव असे आहे.
जमिनीच्या वादातून सुखदेव आणि त्याचे तीन साथीदारांनी काका रवी यांच्यावर कोयत्याने हल्ला केला. कोयत्याच्या हल्ल्यात काकाचा जागीच मृत्यू झाला. जमिनीच्या वादातून हा संपूर्ण प्रकार घडलाय. हत्येच्या दोन्ही घटना एकाच आठवड्यात घडल्या आहेत. या हत्येच्या घटनेने मावळ तालुका हादरला आहे.
पुणे, मावळमध्ये वाढलेल्या गुन्हेगारीच्या घटनेने नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे. शहरात कायद्याचा धाक राहिला नाही का, असा सवाल नागरिकांकडून केला जात आहे. तर वाढत्या गुन्हेगारीच्या घटनांमुळे कायदा सुवव्यस्थेचाही प्रश्न निर्माण झाला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.