Pune Crime: पुणे, सातारा, सांगलीसह ९ ठिकाणी घरफोडी... अट्टल चोरट्याला अटक; लाखोंचे दागिने जप्त

Latest Marathi News: पोलिसांनी आरोपीला सापळा रचून अटक केली असून २ लाख ६३ हजार रुपये किमतीचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.
Pune Crime
Pune CrimeSaamtv

अक्षय बडवे, प्रतिनिधी...

Pune Crime News: पुण्यासह राज्यातील अनेक शहरात घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला पुणे पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. सोनू ऊर्फ संजीव कपूरसिंग टाक (वय २८, रा. गाडीतळ, हडपसर) असे या आरोपीचे नाव असून त्याच्याकडून २ लाख ६३ हजार रुपये किमतीचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. (Crime News In Marathi)

Pune Crime
Maharashtra Politics: वर्षा बंगल्यावर मध्यरात्रीपर्यंत गुप्त खलबतं; महायुतीच्या बैठकीत ३ महत्वाचे ठराव पारित

याबाबत सविस्तर माहिती अशी की, पुण्यातील (Pune) लोणी काळभोर (Loni Kalbhor) परिसरातील घरफोडीच्या गुन्ह्यातील आरोपी सोनू टाक हा मांजरी (Manjari) परिसरात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपीला पकडण्यासाठी सापळा रचला.

या कारवाईत आरोपी सोनू टाकला पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलिसांनी आरोपीकडे केलेल्या चौकशीत गुन्ह्याची कबुली दिली आहे. तसेच त्याच्याकडून घरफोडीचे आणखी नऊ गुन्हे उघडकीस आणले असून, २ लाख ६३ हजार रुपये किमतीचे दागिने जप्त करण्यात करण्यात आले आहेत.

Pune Crime
Maharashtra Shikhar Bank Scam: मोठी बातमी! शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या 14 नेत्यांविरोधात ED कडून चार्जशीट दाखल

सोनू टाक आणि पंकजसिंग दुधानी या दोघांनी या घरफोडी केल्या. पुण्यातील विमानतळ, येरवडा, हडपसर (Hadapsar), लोणीकंद, लोणीकाळभोर तसेच सातारा (Satara), सांगली (Sangli), परभणी, रायगड, ठाणे या ठिकाणी गंभीर घरफोडीचे गुन्ह्यांची कबुली दिली आहे. पोलीस याबाबतचा अधिक तपास पोलीस करत आहेत. (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com