Maharashtra Shikhar Bank Scam: मोठी बातमी! शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या 14 नेत्यांविरोधात ED कडून चार्जशीट दाखल

ED News: मोठी बातमी! शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या 14 नेत्यांविरोधात ED कडून चार्जशीट दाखल
ED News
ED NewsSaam Tv
Published On

Maharashtra Shikhar Bank Scam:

महाराष्ट्र शिखर बँक घोट्याळ्या प्रकरणी ED कडून आज दोन नवीन चार्जशीट दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या चार्चसीटमध्ये शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षातील 14 नेत्याचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे.

मार्चमध्ये ईडीकडून जरंडेश्वर साखर कारखाना प्रकारणी चार्चशीट दाखल करण्यात आली होती. या प्रकरणात अजित पवार आणि सुमित्रा पवार यांचा संबंध असल्याच बोललं जात होतं. मात्र पुढे त्यांचं नाव यातून वगळण्यात आलं.

ED News
Rain Update News: राज्यात 123 वर्षांत ऑगस्ट महिन्यात सर्वात कमी पाऊस; पुणे IMD ची माहिती...

आज ईडीकडून पुन्हा दोन चार्चशीट दाखल करण्यात आल्या आहेत. यात राम गणेश गडकरी साखर कारखाना प्रकरणी प्राजक्त तानपुरे आणि रणजित देशमुख यांच्या नावाचा उल्लेख असल्याच बोललं जात आहे. तर दुसरी चार्चशीट जालना कॉ. स. साखर कारखाना प्रकरणी दाखल करण्यात आली असल्याची माहिती समोर आलीय. (Latest Marathi News)

या चार्चशीटमध्ये शिवसेना नेते माजी मंत्री अर्जुन खोतकर, शरद पवार यांचे निकटवर्तीय असलेले समीर मुळे यांच्याही नावाचा समावेश असल्याची माहिती समोर आलीय. तर याचं प्रकरणात तापडिया बिल्डर समूहाचे व्यवस्थापकीय संचालक जुगल किशोर तापडिया यांच्या नावाचा ही समावेश यात आहे.

ED News
Mumbai Pune Expressway News: पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर शुक्रवारी दोन तासांचा ब्लॉक; कुठून जाल? पर्यायी मार्ग कोणता...

आज ईडीकडून दाखल करण्यात आलेल्या चार्चशीटमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या 14 नेत्यांची नाव समोर आल्याने या नेत्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com