Pune Crime: पुण्यात चाललंय काय! व्यवसायिक दांपत्याला टोळक्याकडून लाठ्या काठ्याने मारहाण|Video Viral

Couple Brutally Assaulted : ठरल्यापेक्षा अधिक भाडे न दिल्यामुळे टोळक्याने व्यवसायिक दांपत्याला मारहाण केलीय. यासर्व प्रकरणी विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून अधिक तपास सुरू आहे.
Couple Brutally Assaulted
Pune Crime: Business couple assaulted with sticks near Tambadi Jogeshwari templesaam tv
Published On
Summary
  • पुण्यात तांबडी जोगेश्वरी मंदिरासमोर व्यवसायिक दांपत्यावर टोळक्याने हल्ला केला.

  • जखमी दांपत्याने पोलिसात तक्रार दाखल केली.

  • पोलिसांनी सहा आरोपींवर गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

अक्षय बडवे, साम प्रतिनिधी

देवाचे आसन विक्री करणाऱ्या व्यवसायिक दांपत्याला टोळक्याकडून मारहाण करण्यात आलीय. ठरल्यापेक्षा अधिक भाडे न दिल्यामुळे टोळक्याने मारहाण केली आहे. ही घटना पुण्यातील तांबडी जोगेश्वरी मंदिरासमोर घडलीय. पुण्यात गुंडंगिरी वाढली असून दररोज मारहाणीच्या घटना घडत आहेत. कधी गोळीबार, कधी कोयता हल्ला अशा घटनांमुळे पुण्यातील कायदा सुव्यवस्था वेशीवर टांगण्यात आलीचं दिसत आहे.

गुंडांना कायद्याचा धाक राहिला नसल्याचं तांबडी जोगेश्वरी मंदिरासमोरील घटनेवरून दिसत आहे. दरम्यान मारहाण झालेल्या दांपत्य जखमी झालेत. याप्रकरणी मयूर आवळे यांनी याबाबत पोलिसात तक्रार दिली आहे. तक्रारीवरून याप्रकरणात विश्रामबाग पोलीस ठाण्यात ६ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. रोहित नाईक, चेतन आसबे, आदर्श आसबे, अनिकेत पवार, हिमांशु चायाळ आणि निलेश धुमाळ यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय.

मिळालेल्या माहितीनुसार, ही सगळी घटना १९ सप्टेंबर रोजी संध्याकाळी ४.३० वाजता तांबडी जोगेश्वरी मंदिराच्या लेनमध्ये अजिंठा इलेक्ट्रॉनिक्स समोर घडली. फिर्यादी आणि त्यांच्या पत्नी तांबडी जोगेश्वरी मंदिरासमोरील देवाचे आसन विक्रीचा आसन विक्रीचा व्यवसाय करतात. व्यवसायाच्या जागेवरून अधिक भाडे न दिल्याच्या कारणावरून आरोपी १९ सप्टेंबर रोजी संध्याकाळी दुकानात पोहचले. हातातील बांबू आणि काठ्यांनी त्यांनी फिर्यादी यांना मारहाण करायला सुरुवात केली. वाद सोडवायला तसेच पतीला वाचवण्यासाठी गेलेल्या फिर्यादी यांच्या पत्नीला सुद्धा आरोपींनी मारहाण केल्याचं फिर्यादीत म्हटलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com