Pune Crime News: उसने दिलेले पैसे मागण्यासाठी तगादा लावला म्हणून सेवानिवृत्त बँक मॅनेजरची केली हत्या

Pune Latest News Updates: आरोपींनी हत्या केल्यानंतर बँक मॅनेजरचा मृतदेह तामिनी घाटात फेकून दिला आणि कारची तसेच मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला आहे.
Pune Crime News
Pune Crime News saam tv

>> गोपाल मोटघरे, साम टीव्ही

Pune Retired Bank Manager Killed : उसने दिलेले पैसे मागण्यासाठी तगादा लावला म्हणून एका सेवानिवृत्त बँक मॅनेजरच अपहरण करून खून करण्यात आला आहे. पुण्याच्या पिंपरी चिंचवड परिसरात ही धक्कादायक घटना घडली आहे.

आरोपींनी हत्या केल्यानंतर बँक मॅनेजरचा मृतदेह तामिनी घाटात फेकून दिला आणि कारची तसेच मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु या प्रकरणातील आरोपींना पिंपरी चिंचवड शहर पोलिसांच्या गुन्हे शाखा दोन पोलीस पथकाने अवघ्या काही तासात बेड्या ठोकल्या आहेत.

Pune Crime News
Sanjay Raut News: विरोधी पक्षांच्या बंगळुरुतील बैठकीत नेमकं काय घडलं? संजय राऊतांनी आगामी लोकसभा निवडणुकीची रणनीतीच सांगितली

रणजीत मेला सिंग असं खून करण्यात आलेल्या सेवानिवृत्त बँक मॅनेजरचं नाव आहे. आरोपींनी ४ लाख रुपयाची सुपारी देऊन रणजीत सिंग यांचा खून केला. रणजीत सिंग यांनी नारायण बापुराव इंगळे यांना 30 लाख रुपये हात उसने दिले होते. त्यामुळे त्यांनी नारायण इंगळेकडे आपले पैसे परत करण्याच्या मागण्यासाठी तगादा लावला होता. याचाच राग मनात धरून नारायण इंगळे यांनी आपले मित्र राजेश नारायण पवार आणि समाधान ज्ञानोबा मस्के यांना रणजीत सिंग यांची हत्या करण्यासाठी ४ लाख रुपयांची सुपारी दिली. (Tajya Marathi Batmya)

पैसे परत देतो म्हणून नारायण इंगळे यांनी वाघोलीत राहणाऱ्या रणजीत सिंग यांना चिंचवड येथे आपल्या राहत्या घरी बोलून घेतले. रणजीत सिंग हे नारायण इंगळेशी बोलत असताना बोलत अचानक नारायणने आपला मित्र राजेश पवार यांच्या मदतीने रणजीत सिंग यांचा दोरीने गळा आवळला. तेवढ्यात समाधान मस्केने रणजीत सिंग यांच्या पोटात चाकूने चार-पाच वेळा वार केले. यात रणजीतचा मृत्यू झाला. (Maharashtra Politics)

Pune Crime News
Maharashtra Rain Live Updates: राज्यात आजही मुसळधार पावसाची शक्यता; कोकणसह पश्चिम महाराष्ट्रात ऑरेन्ज, तर विदर्भात यलो अलर्ट

रणजीत यांची हत्या केल्यानंतर आरोपींनी त्यांचा मृतदेह तामिनी घाटात फेकून देत विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला. तसेच माणगाव एमआयडीसीमध्ये गाडी सोडून देऊन गाडीची देखील विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणात चिंचवड पोलीस स्टेशनमध्ये नारायण इंगळे, राजेश पवार आणि समाधान मस्के ह्या तीन आरोपींविरोधात अपहरण आणि खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Latest Political News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com