Pune Crime: पोलिस पाटलाची गावात दहशत, रोखंडी रॉडने तरुणाला मारहाण; बंदुकीने गोळीबारही केला, गुन्हा दाखल

Pune Police: काही महिन्यांपूर्वी याच पोलिस पाटील गणेश शिंदे यांनी हवेत गोळीबार करून खरीव गावात दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला होता. याप्रकरणी पोलिस पाटलाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Pune Crime: पोलिस पाटलाची गावात दहशत, रोखंडी रॉडने तरुणाला मारहाण; बंदुकीने गोळीबारही केला, गुन्हा दाखल
Pune CrimeSaam Tv
Published On

पुण्यातील राजगड वेल्ह्या तालुक्यात एका व्यक्तीवर प्राणघातक हल्ला करण्यात आला. महत्त्वाचं म्हणजे हल्ला करणारा व्यक्ती हा गावातील पोलिस पाटील आहे. लोखंडी रॉडने ही मारहाण करण्यात आली आहे. या हल्ल्यात अरुण शिंदे हे गंभीर जखमी झाले आहेत. हल्ल्याचे दृश्य एका हॉटेलमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाले आहे. या प्रकरणी राजगड पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काही महिन्यांपूर्वी याच पोलिस पाटील गणेश शिंदे यांनी हवेत गोळीबार करून खरीव गावात दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला होता. खरीव गावातील सार्वजनिक ठिकाणी पोलिस पाटील यांनी आपल्या परवाना असलेल्या बंदुकीने हवेत गोळीबार करून दहशत निर्माण केली होती. या गोळीबाराचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Pune Crime: पोलिस पाटलाची गावात दहशत, रोखंडी रॉडने तरुणाला मारहाण; बंदुकीने गोळीबारही केला, गुन्हा दाखल
Crime News: धक्कादायक! कचऱ्याच्या ढिगाऱ्यात सापडलं बाळ, भटक्या कुत्र्यांनी मृतदेहाचे तोडले लचके

आता वेल्हे पोलिसांनी पोलिस पाटलांविरोधात कारवाई केली आहे. मारहाण प्रकरणी राजगड पोलिस ठाण्यामध्ये गणेश शिंदे आणि तानाजी शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी वेल्हे पोलिस ठाण्याचे पोलिस अंमलदार ज्ञानदीप धिवार यांनी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. भारतीय न्याय संहिता कलम १२५ व भारतीय हत्यार कायद्यानुसार गुन्हा दाखल केला. जीवाला धोका असल्याने अरुण शिंदे यांनी न्याय मिळावा यासाठी गृहमंत्र्यांकडे मदत मागितली आहे.

Pune Crime: पोलिस पाटलाची गावात दहशत, रोखंडी रॉडने तरुणाला मारहाण; बंदुकीने गोळीबारही केला, गुन्हा दाखल
Crime News: बायको माहेरी गेली, नवऱ्याचा पारा चढला, पेट्रोल टाकून स्वत:ला लावली आग

दरम्यान, पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी सोमवारी वेल्हे पोलिस ठाण्यात पोलिस पाटलांची बैठक आयोजित करत त्यांना मार्गदर्शन केले होते. तालुकास्तरावर उत्कृष्ट काम करणाऱ्या पोलिस पाटलांचा सन्मान करणार असल्याचे सांगत कोणत्याही गुन्हेगारी स्वरूपाचे काम होऊ नये म्हणून तंबी सुद्धा दिली होती. मात्र असे असतानाच वेल्हे पोलिस ठाण्यात पोलिस पाटलाविरुद्ध तक्रार दाखल झाल्याने परिसरामध्ये मोठी खळबळ उडाली आहे. यावर प्रशासन कोणती भूमिका घेते याकडे सर्व नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Pune Crime: पोलिस पाटलाची गावात दहशत, रोखंडी रॉडने तरुणाला मारहाण; बंदुकीने गोळीबारही केला, गुन्हा दाखल
Ulhasnagar Crime : दुचाकीवरून येत मोबाईल हिसकावून ठोकली धूम; उल्हासनगरात पहाटेची घटना

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com