Pune Crime News: धक्कादायक! पुण्यात ५०० रुपयांसाठी राडा; तलवार घेवून घरात शिरला अन्...

फिर्यादीने पाचशे रुपये देण्यास नकार दिल्याने आरोपीने थेट घरात घुसून घरच्यांना शिवीगाळ केली
Pune crime News
Pune crime NewsSaam tv
Published On

सचिन जाधव, प्रतिनिधी...

Pune Crime News: पुणे शहरातील वाढती गुन्हेगारी दिवसेंदिवस चिंतेचा विषय ठरत आहे. पुण्यात मारामारीच्या, वाहनांची तोडफोड केल्याच्या घटना वारंवार समोर येत आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.

शहरात अशीच एक धक्कादायक घटना समोर आली असून ५०० रुपये उसने न दिल्याने तलवारीचा धाक दाखवत दहशत माजवून राडा घातल्याचे समोर आले आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. (Crime News In Marathi)

Pune crime News
Nashik Accident News : क्लासला निघालेल्या विद्यार्थ्याचा नाशकात अपघाती मृत्यू, दाेन गंभीर जखमी; पाेलिसांचे पालकांना आवाहन

काय आहे संपूर्ण प्रकरण?

याबाबत समोर आलेल्या माहितीनुसार, पुण्यातील (Pune News) सहकारनगर भागातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पाचशे रुपये उसने न दिल्याने आरोपींकडून चक्क तलवारीने धाक दाखवत राडा घातल्याचे समोर आले आहे. याबाबत पोलिसात फिर्याद देण्यात आली आहे. अफान शेख असे या आरोपीचं नाव असून पोलिसांकडून आरोपीला अटक करण्यात आली.

500 रुपयांसाठी राडा...

फिर्यादीने दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीचे सहकारनगर (Sahkarnagar) परिसरात अंडा भुर्जीचे दुकान आहे. आरोपीने याच हातगाड्या वरती येऊन फिर्यादीकडे ५०० रुपयांची मागणी केली. पण फिर्यादीने पाचशे रुपये देण्यास नकार दिल्याने आरोपी थेट फिर्यादीच्या घरात घुसला. ज्यानंतर त्याने घरात घुसून घरच्यांना शिवीगाळ केली. तसेच घरासमोरच तलवार काढत धमकी देत नागरिकांमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला. (Crime News)

Pune crime News
Abu Azmi Received Threat: फक्त 3 दिवसांचा वेळ आहे! अबू आझमी यांना व्हॉट्सअॅपवर जीवे मारण्याची धमकी

तरुणीवर कोयत्याने हल्ला...

दरम्यान, पुण्यातून आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पुण्यातील सदाशिव पेठेत (Sadashiv Peth) तरुणाकडून युवतीवर कोयत्याने हल्ला करण्यात आला. सदाशिव पेठेत पेरुगेट पोलीस चौकी जवळ घडलेल्या या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. घटनेनंतर पोलिसांनी युवकाला ताब्यात घेतले आहे. पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत. (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com