पुणे : घर सोडून आलेल्या अल्पवयीन मुलामुलींना वासनेची शिकार बनवण्याचा धंदा पुणे स्टेशन परिसरात उघडकीस आला आहे. (Pune) पुणे रेल्वे स्टेशनवर कार्यरत आरपीएफचा कर्मचारी आणि रेल्वेच्याच इमारतीमध्ये कार्यालय एनजीओचा या गुन्ह्यामध्ये सहभाग असल्याचे तपासात निष्पन्न झालं आहे. यामुळे (Crime News) पुण्यामध्ये रक्षकच भक्षक बनल्याचा प्रकार घडला आहे. (Live Marathi News)
पुण्याच्या रेल्वे प्रोटेक्शन फोर्समध्ये कार्यरत असलेला हेड कॉन्स्टेबल अनिल पवार याने हा धक्कादायक प्रकार केला आहे. रेल्वे स्टेशनवर आढळून येणाऱ्या पिडीतांना संरक्षण देणं हे त्याचे काम आहे. मात्र अनिल पवार आणि त्याच्या साथीदारांनी माणुसकीला काळं फासण्याचा प्रकार केला. लग्न करण्यासाठी छत्तीसगडहून पुण्यात आलेल्या अल्पवयीन प्रेमी युगुलाला त्यांनी डांबून ठेवलं. मुलासोबत असलेल्या मुलीवर सलग ५ दिवस बलात्कार केला. तिच्या तक्रारीनंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. इतकेच नाही तर (Pune Crime News) पीडितांच्या पालकांकडून खंडणी वसुली केली जात असल्याचे देखील समोर आले आहे. अनिल पवार याची पत्नी संचालक असलेल्या सिद्धार्थ मल्टीपर्पज एनजीओच्या माध्यमातून हे रॅकेट सुरू होतं.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
मुख्य आरोपी फरार
एनजीओच्या रजिस्टरमध्ये आतापर्यंत सुमारे साडेतीनशे अल्पवयीन मुलामुलींची नोंद आढळून आली आहे. त्यातील अनेकांवर (Pune Railway Station) अत्याचार तसेच शोषण झालं असल्याची शक्यता आहे. मुख्य आरोपी अनिल पवार सध्या फरार आहे. त्याचा साथीदार कमलेश तिवारीसह तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. प्रकरणाचे गांभीर्य बघता त्यामध्ये एक मोठं रॅकेट सक्रिय असण्याची शक्यता आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.