अक्षय बडवे, पुणे|ता. ३० जानेवारी २०२४
पुणे शहरात २२ वर्षीय तरुणाकडे चोरीच्या सात दुचाकी आढळल्याने खळबळ उडाली आहे. तुकाराम ईश्वर आव्हाळे असे या तरुणाचे नाव असून या प्रकरणी चंदननगर पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्यात. तसेच त्याच्याकडून कडून 1 लाख 95 हजार रुपये किंमतीच्या एकूण सात दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, पुणे शहरातील (Pune) २७ वर्षीय व्यक्तीने त्यांची दुचाकी स्प्लेंडर प्लस (MH-26,AZ 0152 ) ही बिल्डींगच्या गेट समोर लॉक करून लावली असता चोरीला गेली असल्याने त्यांनी पोलिसात तक्रार दिली होती. पोलिसांनी याप्रकरणी शोध घेत असताना सीसीटिव्ही फुटेज तपासले. या तपासात तुकाराम आव्हाळे याचे नाव समोर आले. पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे या तरुणाला सापळा रचून अटक केली.
अटकेनंतर पोलिसांच्या चौकशीत तुकाराम हा मजुरी करत असून त्याच्याकडे चोरीच्या सात दुचाकी असल्याचे निष्पन्न झाले. सराईत गुन्हेगार असणारा तुकाराम आव्हाळे याने विश्रांतवाडी,चंदन नगर, हडपसर परिसरात अनेक दुचाकी चोरी केल्या असल्याचे तपासात उघड झाले आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
पोलीस कर्मचाऱ्यांनी टाकला पोलीस ठाण्यात दरोडा
लोणी काळभोर पोलीस ठाण्यात दुचाकी चोरीचा गुन्हा दाखल करत पोलिसांनी एका आरोपीला अटक केली होती. या आरोपीकडून चौकशी केली असता धक्कादायक माहिती समोर आली. या आरोपीने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात कार्यरत असणाऱ्या कर्माच्यांनी च काही दुचाकी परस्पर विकायला सांगितले अशी कबुली या आरोपीने दिली आहे. या प्रकरणी चारही पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. (Latest Marathi News)
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.