Pune Crime News: 'आमच्याशी कोणी पंगा घेतला तर...' म्हणत टोळक्यांकडून तरुणाची हत्या; पुण्यातील घटनेने नागरिक दहशतीत

Pune Crime News: पुण्यातून खळबळजनक घटना समोर आली आहे. पुण्यातील हडपसरमध्ये पूर्ववैमनस्यातून टोळक्याने १७ वर्षीय तरुणाची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
Pune Hadpasar police station
Pune Hadpasar police stationSaam Tv

Pune Crime News:

पुण्यातून खळबळजनक घटना समोर आली आहे. पुण्यातील हडपसरमध्ये पूर्ववैमनस्यातून टोळक्याने १७ वर्षीय तरुणाची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यात जुना राग मनात धरून टोळक्याने लोखंडी हत्याराने वार करून एका तरुणाची हत्या केल्याची घटना घडली आहे. पुण्यातील हडपसर भागामध्ये पूर्ववैमनस्यातून टोळक्याने १७ वर्षीय तरुणाची हत्या केली आहे. स्वप्निल झुंबर्डे असं हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे.

Pune Hadpasar police station
Shirpur Crime News: शेतीच्या वादातून भाऊ, पुतण्याकडून मारहाण; शेतकऱ्याचा मृत्यू

या घटनेनंतर पोलीस अलर्ट झाले. पोलिसांनी या प्रकरणी कारवाई सुरु केली आहे. पोलिसांनी आतापर्यंत सनी रावसाहेब कांबळे, अमन साजिद शेख , आकाश हनुमंत कांबळे, जय शंकर येरवळे, तौफिक रज्जाक शेख, शाहरुख साजिद शेख या तरुणांना ताब्यात घेतलं आहे.

नेमकं काय घडलं?

पुण्यातील टोळक्याचा स्वप्निल झुंबर्डे या तरुणाशी जुना वाद होता. याच जुन्या वादातून टोळक्यांनी स्वप्निल झुंबर्डे या तरुणाला हडपसरमध्ये गाठलं. या टोळक्यांनी काल हडपसर भागात स्वप्निलला भेटून पूर्वीच्या भांडणाचा राग मनात धरून त्यांच्याकडील धारदार लोखंडी हत्याराने डोक्यावर हल्ला केला. या हल्ल्यात स्वप्नीलचा जागीच मृत्यू झाला

Pune Hadpasar police station
Pune Crime News: पुण्यात अल्पवयीन मुलाचे अपहरण करून हत्या; ओंकार कापरेसह 10 जणांवर ‘मोक्का

तसेच या तरुणांनी त्यांच्याकडे धारदार लोखंडे हत्यारे हवेत फिरवून, "आमच्यासोबत कोणी पंगा घेतला तर असाच एक एकाचा मुडदा पाडू" असे बोलून परिसरात दहशत पसरवली. हत्येच्या या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com