सचिन जाधव, साम टीव्ही
Pune Crime News: ढोलपथकामध्ये सराव करण्यासाठी गेलेल्या अल्पवयीन मुलाचे अपहरण करुन त्याची हत्या करणाऱ्या चंद्रशेखर कापरे याच्यासह त्याच्या टोळीतील १० जणांवर मोक्का लावण्यात आला आहे. पुणे पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी ही कारवाई केली आहे. या कारवाईमुळे पुण्यातील गुन्हेगारांना वचक बसणार आहे. (Latest Marathi News)
कोंढवा येथील १६ वर्षीय अल्पवयीन मुलगा मुलगा मनपा शाळेमागे ढोलपथकामध्ये सराव करण्यासाठी गेला होता. मात्र, तो उशीरापर्यंत घरी परत न आल्याने त्याच्या कुटुंबियांनी कोंढवा पोलीस ठाण्यात मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती.
कोंढवा पोलिसांनी आयपीसी 363 नुसार गुन्हा दाखल करुन मुलाचा शोध सुरु केला. त्यावेळी बेपत्ता मुलाचा मृतदेह दिवेघाटाजवळ आढळून आला होता. आरोपींनी मुलाचे कोंढव्यामधून मोटारीतून अपहरण केले. मंतरवाडीजवळ लाकडी दांडक्याने मारहाण करून मुलाचा खून केला.
याप्रकरणी पोलिसांनी या प्रकरणी तपासाची चक्रे फिरवत ओंकार चंद्रशेखर कापरे (वय २७, रा. कोंढवा खुर्द), साईराज लोणकर (वय २३, रा. उंड्री), प्रणय पवार (वय १९), सौरभ ऊर्फ दत्ता तायडे (वय १८), कृष्णा जोगदंडे (वय २०), महादेव ऊर्फ पप्पू गजाकोष (वय १९), रोहन अनिल गवळी (वय २१, सर्व रा. कोंढवा खुर्द) यांना अटक केली होती.
याशिवाय दोन अल्पवयीन मुलांना देखील ताब्यात घेतले. तर, राज ठोंबरे आणि अमन (पूर्ण नाव नाही) हे आरोपी फरार झाले आहेत. याप्रकरणी चंद्रशेखर कापरे याच्यासह त्याच्या टोळीतील १० जणांवर मोक्का लावण्यात आला आहे. आरोपींवर खून, खुनाचा प्रयत्न असे गंभीर गुन्हे कोंढवा व वानवडी पोलिस ठाण्यात दाखल आहेत.
Edited by - Satish Daud
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.