Ganeshotsav 2023: गणेशोत्सवानिमित्त पुण्यातील वाहतुकीत मोठे बदल; शहरातील अनेक रस्ते बंद, पर्यायी मार्ग कोणते?

Pune Ganeshotsav 2023: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल करण्यात आले आहे. शहरातील मध्यवस्तीत दोन दिवसांचा वाहतूक बदल करण्यात आला आहे.
Ganeshotsav 2023 big change traffic in pune many roads closed see alternative routes
Ganeshotsav 2023 big change traffic in pune many roads closed see alternative routesSaam TV

सचिन जाधव, साम टीव्ही

Pune Ganeshotsav 2023: गणेशोत्सवाचा सण अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला आहे. लाडक्या बाप्पाच्या आगमनासाठी अनेकजण सज्ज झाले आहेत. अशातच पुणेकरांसाठी एक महत्वाची अपडेट समोर आली आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल करण्यात आले आहे. शहरातील मध्यवस्तीत दोन दिवसांचा वाहतूक बदल करण्यात आला आहे.  (Latest Marathi News)

Ganeshotsav 2023 big change traffic in pune many roads closed see alternative routes
Maharashtra Politics: उद्धव ठाकरेंना 'धनुष्यबाण' परत मिळणार? शिवसेना पक्ष अन् चिन्हावर आज 'सुप्रीम फैसला'

वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक शाखेच्या वतीने करण्यात आले आहे. पुणे शहरात गणेशमूर्ती (Ganeshotsav 2023) विक्रीचे स्टॉल हे मोठ्या प्रमाणात डेंगळे पूल ते शिवाजी पुलाच्या श्रमिक भवन समोर आहेत. याशिवाय कसबा पेठ पोलीस चौकी ते जिजामाता चौकात देखील अनेक स्टॉल आहेत.

त्यामुळे या भागातील वाहतूक बदल करण्यात आला असून पर्यायी वाहतूक व्यवस्था (Pune News) करण्यात आली आहे. शिवाजी रोड- गाडगीळ पुतळा चौक ते गोटीराम भैय्या चौक (मंडई) परिसर वाहतुकीसाठी बंद असणार आहे. १८ ते १९ सप्टेंबर रोजी सकाळी सहा ते रात्री १२ दरम्यान वाहतूक बदल असणार आहे.

पुणे शहरात अवजड वाहनांच्या वाहतुकीस बंद

- लक्ष्मी रस्ता- संत कबीर चौक ते टिळक चौक

- केळकर रस्ता - फुटका बुरुज ते टिळक चौक

- कुमठेकर रस्ता- शनिपार ते टिळक चौक

- बाजीराव रस्ता- पूरम चौक ते गाडगीळ पुतळा

- टिळक चौक - जेधे चौक ते टिळक चौक

- शास्त्री रस्ता- सेनादत्त चौकी चौक ते टिळक चौक

- कर्वे रस्ता- नळस्टॉप चौक ते खंडोजीबाबा चौक

- फर्ग्युसन कॉलेज रस्ता- खंडोजीबाबा चौक ते वीर चाफेकर चौक

- जंगली महाराज रस्ता- स. गो. बर्वे चौक ते खंडोजीबाबा चौक

- शिवाजी रस्ता- गाडगीळ पुतळा ते जेधे चौक.

Edited by - Satish Daud

Ganeshotsav 2023 big change traffic in pune many roads closed see alternative routes
ICC ODI Ranking: आशिया कप जिंकूनही टीम इंडियाचं नुकसान; पाकिस्तानला झाला मोठा फायदा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com