Pune : जमिनीसाठी मामाचा काढला काटा! भाच्याने मित्रांच्या मदतीने कट रचला, अन्....

Pune Crime News Today : पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात जमिनीच्या वादातून भाच्याने मित्रांच्या मदतीने मामाचा खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. राजगड पोलिसांनी तिघांना अटक केली असून २३ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
Pune Crime News Today
Pune Crime News Today
Published On: 

जमिनीचे हक्क सोडपत्र देण्यास नकार दिल्यामुळे पोटच्या गोळ्यासारख्या सांभाळलेल्या भाच्यानेच मित्रांच्या मदतीने आपल्या मामाचा काटा काढल्याची धक्कादायक घटना पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात उघडकीस आली आहे. मौजे सांगवी बुद्रुक येथील पोलीस पाटील अशोक साधू येनपुरे (५०) यांच्या खूनाचा राजगड पोलिसांनी यशस्वी उलगडा केला असून, या प्रकरणातील संशयित आरोपी असणाऱ्या बहिणीच्या मुलानेच कट रचून हा खून केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी राजगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रतीक रामदास शेजवळ (वय 22, रा. सांगवी बुद्रुक ता.भोर जि.पुणे), प्रज्वल उर्फ प्रशांत संतोष गोगावले (वय 18 वर्ष रा. गोगलवाडी ता.हवेली जि पुणे) आणि प्रणव कैलास गोगावले (वय 19 वर्ष रा.गोगलवाडी ता. हवेली जि पुणे) असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा सगळा प्रकार १६ नोव्हेंबर रोजी पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात असणाऱ्या मौजे सांगवी येथे घडला.

फिर्यादी यांनी दिलेल्या दिलेल्या फिर्याद नुसार, अशोक साधू येनपुरे हे १६ नोव्हेंबर रोजी मौजे सांगवी येथील लमनदेव मंदिराजवळ सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास त्यांच्या दुचाकी वरून शेतातून घरी जात होते. यावेळी प्रतिक शेजवळ व त्याच्या दोन मित्रांनी त्यांना अडवले. अशोक येनपुरे हे त्यांच्या आई लिलाबाई यांचे वडिलोपार्जित असलेले जमिनीचे हक्क सोडपत्र देत नसल्याचे कारणावरून त्यांच्यात वाद झाले. हा राग मनात ठेऊन आरोपींनी आरोपींनी जवळील असलेल्या धारधार कोयत्याने त्यांच्या डोक्यावर, उजव्या कानावर, उजव्या हाताचे दंडावर वार केले. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले. त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल केले असता त्यांचा मृत्यू झाला होता.

Pune Crime News Today
SBI ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! गुरूवारी ४५ मिनिटे बंद राहणार UPI सर्व्हिस; वाचा नेमकी वेळ आणि पर्याय

या प्रकरणाचा तपास करत असताना राजगड पोलिसांनी तीन जणांना अटक केली असून आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने तिन्ही आरोपींना २३ नोव्हेंबर पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. या हल्यात किंवा त्याच्या कटात आणखी कोणाचा सहभाग होता का याचा पोलिसांकडून तपास सुरू आहे.

Pune Crime News Today
Dadar Railway Station : दादर रेल्वे स्थानकाचं नामकरण होणार, नवीन नावही ठरलं, मुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.