Pune : पुण्यातील नामंकित कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांची रॅगिंग; ५ जणांवर गुन्हा

Pune Crime News : पुण्यातील आयएलएस लॉ कॉलेजच्या वसतिगृहात रॅगिंगचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. या प्रकरणी पाच विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल. डेक्कन पोलिसांचा तपास सुरू.
PUNE ILS LAW COLLEGE RAGGING CASE FIVE STUDENTS BOOKED
PUNE ILS LAW COLLEGE RAGGING CASE FIVE STUDENTS BOOKEDSaam tv
Published On
Summary
  • आयएलएस लॉ कॉलेज वसतिगृहात रॅगिंगचा प्रकार

  • पाच विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल

  • डेक्कन पोलिसांकडून तपास सुरू

  • विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर

PUNE ILS LAW COLLEGE RAGGING CASE FIVE STUDENTS BOOKED पुणे शहरातील नामांकित आयएलएस विधी महाविद्यालयाच्या मुलांच्या वसतिगृहात रॅगिंगचा प्रकार उघडकीस आला असून या घटनेमुळे शैक्षणिक वर्तुळात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी डेक्कन पोलिसांनी ‘एलएलबी’च्या द्वितीय वर्षात शिकणाऱ्या पाच विद्यार्थ्यांविरुद्ध महाराष्ट्र रॅगिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी हा ३५ वर्षीय विद्यार्थी असून तो आयएलएस लॉ कॉलेजमध्ये ‘एलएलबी’च्या द्वितीय वर्षात शिक्षण घेत आहे. तो महाविद्यालयाच्या रस्त्यावरील मुलांच्या वसतिगृहात राहतो. त्याच वसतिगृहात राहणाऱ्या इतर पाच विद्यार्थ्यांनी त्याच्याशी गैरवर्तन करत शिवीगाळ केली तसेच मानसिक त्रास देत रॅगिंग केल्याचा आरोप करण्यात आला आहे. पीडित विद्यार्थ्याने काही महिन्यांपूर्वी डेक्कन पोलिस ठाण्यात लेखी अर्ज देऊन तक्रार नोंदवली होती.

PUNE ILS LAW COLLEGE RAGGING CASE FIVE STUDENTS BOOKED
Political News : शिवसेनेत पुन्हा बंडाळी? विधानपरिषद निवडणुकीसाठी ८ जणांची नावे चर्चेत, एकनाथ शिंदे कोणाला संधी देणार?

या अर्जाच्या आधारे पोलिसांनी प्राथमिक चौकशी केली. चौकशीत रॅगिंग झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर अखेर संबंधित पाच विद्यार्थ्यांविरुद्ध महाराष्ट्र रॅगिंग प्रतिबंधक कायद्याच्या कलम ३ आणि ४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या घटनेबाबत पीडित विद्यार्थ्याने महाविद्यालय प्रशासनाकडेही तक्रार दिली होती. मात्र, प्रशासनाने यावर नेमकी कोणती कारवाई केली, याची माहिती अद्याप स्पष्ट झालेली नाही.

PUNE ILS LAW COLLEGE RAGGING CASE FIVE STUDENTS BOOKED
Shocking : नामंकित हॉटेलवर पोलिसांची रेड, रूमचा दरवाजा उघडताच तरुण- तरुणी नको त्या अवस्थेत सापडले

पोलिसांकडून महाविद्यालय प्रशासनाशी संपर्क साधून याबाबत अधिक माहिती घेतली जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे. या घटनेमुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. उच्च शिक्षण संस्थांमध्ये रॅगिंगविरोधी कडक नियम असतानाही असे प्रकार घडत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, डेक्कन पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून संबंधित विद्यार्थ्यांची चौकशी सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com