Crime : पुण्यात नंगानाच सुरूच, लघुशंका करणाऱ्याला अडवणाऱ्या पती-पत्नीवर कोयत्याने वार

Pune Crime News : पुण्यातील वडगाव येथे धक्कादायक घटना घडली आहे. लघुशंका करणार्‍यांना हटकणाऱ्या पती-पत्नीवर तिघांनी कोयत्याने सपासप वार केले. याप्रकरणी गुन्हा दाखल झाला असून चौकशी सुरू आहे.
Pune Crime News
Pune Crime News
Published On

सागर आव्हाड, साम टीव्ही पुणे प्रतिनिधी

Crime News Update : येरवडा बीएमडब्ल्यू लघुशंका प्रकरणानंतर पुण्यात पुन्हा एकदा नंगानाच सुरूच असल्याचे दिसतेय. लघुशंका केल्यावरून कोयत्याने वार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. लघुशंका करणार्‍यांना जाब विचारणाऱ्या पती-पत्नीवर तिघांनी कोयत्याने सपासप वार केले. तिघांवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एडी भाईच्या मुलाने हे कृत्य केल्याचं समोर आले आहे.

वडगाव येथे पती-पत्नी कट्ट्यावर बसलेले असताना त्यांच्या शेजारी उभे राहून लघुशंका करणार्‍या तरुणाला हटकले. या कारणावरुन तीन तरुणांनी पत्नीच्या डोक्यात कोयत्याने वार केले. पतीला पकडून आम्ही येथेच लघवी करणार, आम्ही एडी भाईची मुले आहोत. मला अडवणार काय? आज तुझी विकेटच टाकतो, असे बोलून पतीच्या डोक्यात कोयत्याने वार करुन ठार मारण्याचा प्रयत्न केला.

Pune Crime News
Crime : तरूणीकडे पाहून हस्तमैथुन अन् अश्लील चाळे, नागपूरच्या रस्त्यावर तरूणाचे घृणास्पद कृत्य|VIDEO

शास्त्रीनगर चौकात घडलेल्या घृणास्पद प्रकाराची सर्वत्र चर्चा सुरू असतानाच सिंहगड रोडवरील वडगाव येथे धक्कादायक प्रकार घडला. धायरी येथील महादेव नगर येथे राहणार्‍या ३७ वर्षाच्या महिलेने सिंहगड रोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व त्यांचे पती हे कामावरुन दुचाकीने घरी निघाले होते. क्षेत्रीय कार्यालयाचे समोरील बाजूला असलेल्या कट्ट्यावर बसून ते गप्पा मारत होते. रात्री आठ वाजण्याच्या सुमारास ते बसलेल्या कट्ट्याचे जवळ एक दुचाकी थांबली.

Pune Crime News
Pune News : पुण्यात भर चौकात अश्लील चाळे, साताऱ्यात ठोकल्या बेड्या

दुचाकीवरुन तिघे जण उतरले. त्यापैकी एक जण त्यांच्या शेजारीच उभा राहून लघुशंका करु लागला. तेव्हा फिर्यादीचे पतीने त्याला लेडीजसमोर लघवी करतोस असे विचारले. त्यावर तो मुलगा शिवीगाळ करु लागला. तेव्हा फिर्यादी महिलेने तुम्ही आम्हाला शिव्या का देता? असे विचारले. त्यांच्यापैकी पिस्ता कलरचा चेक्स शर्ट घातलेल्याने मुलाने पतीला धक्का मारला. कमरेला लावलेला कोयता काढून तो उलटा करुन फिर्यादी यांच्या हातावर मारला. त्यांचा गळा पकडला. त्यांच्या डोक्यात कोयत्याने वार केला.

महिलेचा पती सोडविण्यासाठी मध्ये आला, असताना एकाने पतीला पाठीमागून पकडले. वडगाव आमच्या भाईचे आहे, आम्ही येथेच लघवी करणार, कोण आम्हाला आडवतो? तेच बघतो, तू मला अडवणार काय? आजच तुझी विकेटच टाकतो, असे म्हणून हातातील कोयत्याने एका व्यक्तीने पतीच्या डोक्यात वार केला. पतीने तो वार चुकविण्याचा प्रयत्न केला. पण,तो डोक्याच्या मागील बाजूला लावून ते जखमी झाले. त्यांच्यासोबतच्या तिसरा शिवीगाळ करु लागला. त्यांच्या आवाजाने नागरिकांची गर्दी होऊ लागल्याने ते तिघे पळून गेले. पुढे जाऊन त्यांनी हातातील कोयते हवेत नाचवत गोंधळ घालून लोकांना धमकावले. या घटनेची माहिती मिळाल्यावर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com