Pune News : पुण्यात भर चौकात अश्लील चाळे, साताऱ्यात ठोकल्या बेड्या

Pune Crime News : पुण्यात अश्लील कृत्य करणाऱ्या गौरव अहुजा याला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. त्याची ससून रूग्णालयात वैदकीय चाचणी होणार आहे. सार्वजनिक ठिकाणी अश्लील चाळे केल्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pune BMW News : पुण्यात भर चौकात अश्लील चाळे करणाऱ्या गौरव अहुजा याला साताऱ्यातून ताब्यात घेण्यात आले आहे. ८ मार्च रोजी सकाळी भर चौकात गौरव अहुजा याने अश्लील कृत्य केले होते, त्यानंतर एकच संतापाची लाट उसळली होती. त्याला सातारा पोलिसांनी अटक केली असून पुणे पोलिसांच्या स्वाधीन केलेय. गौरव आहूजा बरोबर असलेला त्याचा मित्र भाग्यश ओसवाला याला शनिवारी येरवडा पोलिसांनी अटक केली. बीएमडब्ल्यू मध्ये बसून तो दारू पीत होता, त्यावेळी पोलिसांनी बेड्या ठोकल्या.

अटकेआधी व्हिडीओ -

पुण्यात अश्लील कृत्य करणाऱ्या गौरव अहुजा याचा पोलिसांकडून शनिवारी शोध घेतला जात होता. त्यावेळी त्याचा एक व्हडीओ समोर आला, त्यामध्ये त्याने जाहीर माफी मागितली होती. माझ्याकडून पब्लिकमध्ये जे कृत्य झालं होतं, ते खूप चुकीचं होतं. संपूर्ण जनता, पोलीस डिपार्टमेंट आणि शिंदे साहेबांची मी माफी मागतो.. मला एक संधी द्या..माझ्या कुठल्याही फॅमिली मेंबरला त्रास देऊ नका. मी सरेंडर होणार आहे, असे त्याने व्हिडीओत म्हटलेय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com