Pune Crime: कॉन्ट्रॅक्टरच्या मुलाची निर्घृण हत्या, निगडी परिसरात खळबळ
Building Contractor Son Killed In NigdiSaam Tv

Pune Crime: कॉन्ट्रॅक्टरच्या मुलाची निर्घृण हत्या, निगडी परिसरात खळबळ

Building Contractor Son Killed In Nigdi: निगडीमध्ये दोन अल्पवयीन मुलांनी बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टरच्या मुलाची निर्घृण हत्या केली. या घटनेमुळे निगडीमध्ये खळबळ उडाली आहे.
Published on

गोपाळ मोटघरे, पिंपरी-चिंचवड

पुण्यामध्ये गुन्हेगारीच्या घटना दिवसेंदिवस समोर येत आहेत. हत्या, अत्याचार, चोरी, अपहरण, मारहाण आणि कोयता हल्ला यासारख्या घटना पुण्यामध्ये वारंवार घडत आहेत. गुन्हेगारांना पोलिसांचा धाकच राहिला नसल्याचे चित्र पुण्यामध्ये पाहायाला मिळत आहे. अशातच आता पुण्याला लागून असलेल्या निगडी परिसरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. दोन अल्पवयीन मुलांनी बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टरच्या मुलाची निर्घृण हत्या केली. या घटनेमुळे निगडीमध्ये खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, निगडी येथे बिल्डिंग कॉन्ट्रक्टरच्या अल्पवयीन मुलाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. मंगळवारी रात्री धारधार शस्त्राने वार करत त्यांची हत्या केली गेली. मोहम्मद सैपन बागवान (१६ वर्षे) असं हत्या करण्यात आलेल्या मुलाचे नाव आहे. मोहम्मदची हत्या करून आरोपी घटनास्थळावरून फरार झाले. निगडी पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल करत अवघ्या काही तासांमध्ये त्यांना बेड्या ठोकल्या.

Pune Crime: कॉन्ट्रॅक्टरच्या मुलाची निर्घृण हत्या, निगडी परिसरात खळबळ
Pune News : जमिनीची मोजणी करताना जमावाकडून सरकारी अधिकाऱ्याला मारहाण; २ जण जखमी

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना काल रात्री ७ ते ७.३० वाजेच्या सुमारास निगडी परिसरातील मासाहेब मीनाताई ठाकरे मार्गाजवळ घडली. तेथे काही अल्पवयीन मुले जमली होती आणि यादरम्यान त्यांच्यात आपसी वाद सुरू झाला. यावेळी दोघांनी आपल्या सोबत आणलेल्या धारधार शस्त्राने मोहम्मद सैपन बागवानवर वार केले. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या मोहम्मदचा मृत्यू झाला. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. हत्येनंतर आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला. पण पोलिसांनी त्यांना अटक केली.

Pune Crime: कॉन्ट्रॅक्टरच्या मुलाची निर्घृण हत्या, निगडी परिसरात खळबळ
Pune Water Cut: पुणेकरांनो लक्ष असू द्या! गुरूवारी पाणीपुरवठा राहणार बंद, कोणकोणत्या भागांचा समावेश?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com