Amravati Crime: अमरावतीत सिनेस्टाईल थरार! भरचौकात तरुणाची हत्या; पाठलाग करुन चौघांनी संपवलं

Maharashtra Crime News: चित्रा चौकात चार जणांनी जुन्या वादातून धारदार चायना चाकूने हल्ला करण्यात आला. या प्राणघातक हल्ल्यात त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.
Amravati Crime: अमरावतीत सिनेस्टाईल थरार! भरचौकात तरुणाची हत्या; पाठलाग करुन चौघांनी संपवलं
Maharashtra Crime News: Saamtv
Published On

अमर घटारे, अमरावती: गेल्या काही दिवसांपासून राज्यात खून, मारामाऱ्या आणि अत्याचारांच्या घटनांचे सत्र सुरु आहे. दोन दिवसांपूर्वी मुंबईमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. या भयंकर घटनेने अवघा महाराष्ट्र हादरुन गेला होता. अशातच आता अमरावतीमधून एक मोठी बातमी समोर आली असून अमरावतीमध्ये भरचौकात एकाची हत्या करण्यात आली आहे.

Amravati Crime: अमरावतीत सिनेस्टाईल थरार! भरचौकात तरुणाची हत्या; पाठलाग करुन चौघांनी संपवलं
Maharashtra Politics: साताऱ्यानंतर मराठवाड्यातही अजित पवारांचं टेन्शन वाढलं, आणखी एक आमदार शरद पवार गटाच्या वाटेवर

याबाबत सविस्तर माहिती अशी की, अमरावती शहरातील रतनगंज परिसरातील गोलू उसरेटे या 30 वर्षीय युवकावर चित्रा चौकात चार जणांकडून जुन्या वादातून धारदार चायना चाकूने हल्ला करण्यात आला. या प्राणघातक हल्ल्यात त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. या भयंकर घटनेने अमरावती शहर हादरुन गेले आहे. हत्येनंतर शहरात काही काळ तणावाचे वातावरणही पसरल्याचे पाहायला मिळाले.

गोलू रात्री दहा वाजताच्या सुमारास चित्रा चौकात मित्रांसोबत फिरायला आला होता. यावेळी चौकात चार तरुणांसोबत शुल्लक कारणावरून त्याचा वाद झाला. यावेळी या चौघांनी चाकू हल्ला केल्याने गोलूने पळून जाण्याचा प्रयत्न केला मात्र गोलूचा पाठलाग करत या चारही इसमांनी गोलूवर धारदार शस्त्राने चायना चाकूने सपासप वार केले. रक्तबंबाळ अवस्थेत गोलूला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले असता त्याला मृत घोषित करण्यात आले.

Amravati Crime: अमरावतीत सिनेस्टाईल थरार! भरचौकात तरुणाची हत्या; पाठलाग करुन चौघांनी संपवलं
Maharashtra Politics: मोठी बातमी! शरद पवारांना ८५ जागा मिळणार, दोन दिवसांत यादी निश्चित होणार, बारामतीमधून युगेंद्र पवार मैदानात?

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच गोलुणे शहरात सर्वात मोठी कावड यात्रा काढलेली होती. गोलू च्या हत्येची माहिती मिळतात रतनगंज परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. तसेच कुटुंबीयांनी जिल्हा सामान्य रुग्णालयात आक्रोश केला. पोलिस घटनास्थळी दाखल झाले व तो आक्रोश शांत केला

दुसरीकडे नागपूरमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. राजकीय वैमनस्यातून नागपूरच्या अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत काँग्रेस पदाधिकाऱ्यावर हल्ला करण्यात आला आहे. दक्षिण नागपूर विधानसभा क्षेत्रात काँग्रेस नेते व इच्छुक उमेदवार गिरीश पांडव यांचा सहकारी सुहास नानवटकर यांच्यावर हा हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात सुहास नानवटकर जखमी झाले असून दोघांना अटक करण्यात आली आहे.

Amravati Crime: अमरावतीत सिनेस्टाईल थरार! भरचौकात तरुणाची हत्या; पाठलाग करुन चौघांनी संपवलं
Pune Crime: मित्रानेच मित्राला संपवलं, हात- पाय बांधून कचऱ्यात फेकलं; पुण्यातील भयंकर घटना

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com