Pune : पत्नीसोबत चॅटिंग केल्याने तरुणाचे अपहरण; दिवेघाटात जिवे मारणार इतक्यात पोलिसांची 'सिनेस्टाइल' एन्ट्री

Pune Crime News : पत्नीशी मोबाईलवर चॅटिंग करत असल्याच्या संशयातून पुण्यात २३ वर्षीय तरुणाचे अपहरण करून हत्या करण्याचा प्रयत्न करण्यात आला. या प्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.
KOLKATA WOMAN ALLEGES FORCED CONVERSION ATTEMPT AT KAMTHI DARGAH, THREE ARRESTED IN NAGPUR CASE
KOLKATA WOMAN ALLEGES FORCED CONVERSION ATTEMPT AT KAMTHI DARGAH, THREE ARRESTED IN NAGPUR CASESaam Tv
Published On
Summary
  • पत्नीशी मोबाईलवर चॅटिंग करत असल्याच्या संशयातून तरुणाचे अपहरण

  • अंधाराचा फायदा घेत तरुणाने स्वतःची सुटका करून घेतली

  • पोलिसांनी तातडीने तपास करत ३ जणांना अटक केली

  • पुढील पोलीस तपास सुरू आहे

सागर आव्हाड, पुणे

पुण्यातून धक्कादायक घटना समोर आली आहे. पत्नीशी मोबाईलवर चॅटिंग करत असल्याच्या संशयातून २३ वर्षीय तरुणाचे अपहरण करून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र पोलिसांच्या सतर्कतेमुळे अपहरणकर्त्यांचा डाव अर्ध्यावर मोडला. तांत्रिक तपास आणि दिवेघाट परिसरातील थरारक पाठलागामुळे अपहरण झालेल्या तरुणाची सुखरूप सुटका करण्यात पोलिसांना यश आले. या प्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली असून एका महिलेलाही ताब्यात घेण्यात आले आहे. ऋषिकेश विजय चांदगुडे असे अपहरण झालेल्या तरुणाचे नाव आहे. ओंकार प्रकाश भोसले आणि तन्मय सुधीर साळुंखे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी सायंकाळी आरोपींनी ऋषिकेश याला सुपा-मोरगाव मार्गावरील चतुर्थी हॉटेल परिसरात बोलावून घेतले. त्यानंतर फॉरेस्ट गेट परिसरात त्याला पिस्तूल आणि चाकूचा धाक दाखवत जबरदस्तीने स्विफ्ट कारमध्ये बसवण्यात आले. आरोपी त्याला पुण्याच्या दिशेने घेऊन जात असताना त्याच्यावर चाकूने हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला. स्वतःला वाचवताना चाकू त्याच्या डाव्या भुवईजवळ लागल्याने तो जखमी झाला.

KOLKATA WOMAN ALLEGES FORCED CONVERSION ATTEMPT AT KAMTHI DARGAH, THREE ARRESTED IN NAGPUR CASE
Dadar Accident : मुंबईत भीषण अपघात! बेस्ट बसची वाहनांना धडक, २ जणांचा जागीच मृत्यू, १३ गंभीर

यानंतर आरोपींनी त्याला दिवेघाटाच्या पायथ्याशी नेऊन मारहाण केली. मात्र, अंधाराचा फायदा घेत ऋषिकेशने आरोपींच्या तावडीतून सुटका करून घेतली आणि मित्रांच्या मदतीने पोलिसांशी संपर्क साधला. घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक नवसरे यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक रवाना करण्यात आले. जेजुरी, सासवड, उरुळीकांचन आणि यवत पोलिसांना तत्काळ नाकाबंदीच्या सूचना देण्यात आल्या.

KOLKATA WOMAN ALLEGES FORCED CONVERSION ATTEMPT AT KAMTHI DARGAH, THREE ARRESTED IN NAGPUR CASE
Flight Service Closed : प्रवाशांसाठी मोठी बातमी! सोलापूर-गोवा , हैदराबाद विमानसेवा पुढील ३ महिन्यांसाठी बंद राहणार

मोबाईल कॉलचे लोकेशन ट्रेस केल्यावर लोकेशन दिवेघाट परिसरात असल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार पोलिसांनी शोधमोहीम राबवत सासवड पोलिसांच्या मदतीने झेंडेवाडी येथे संशयितांची स्विफ्ट कार अडवली. या प्रकरणी सुपा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक केलेल्या दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जिनेश कोळी करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com