नितीन पाटणकर, पुणे, ता. २४ नोव्हेंबर २०२३
झोपमोड केल्याच्या रागातून भाडेकरुने घरमालकाची हत्या केल्याचा खळबळजनक प्रकार पुण्यात घडला. ही घटना ताजी असतानाच आणखी एक हत्येची घटना समोर आली आहे. शहरातील वानवडी परिसरातील एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये पत्नीने पतीची निर्घृण हत्या केल्याचे उघडकीस आले आहे. घरगुती वादातून ही हत्या झाल्याचे समोर आले असून पोलिसांनी आरोपी पत्नीला ताब्यात घेतले आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, पुण्यातील (Pune) वानवडी परिसरात पत्नीने पतीची निर्घृण हत्या केल्याचे उघडकीस आले आहे. शुक्रवारी (२४, नोव्हेंबर) दुपारी साडे बारा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. रेणुका खन्ना रा.वानवडी (वय.३६)व निखिल पुष्पराज खन्ना, (वय ३६) या पती- पत्नीमध्ये किरकोळ कारणावरुन वाद झाला.
याच वादाच्या रागातून पत्नी रेणुका खन्नाने पती निखीलला मारहाण करण्यास सुरूवात केली. या हल्ल्यात जबर मार लागल्याने निखीलचा मृत्यू झाला. याबाबत हल्लेखोर पत्नीने सासरे डॉ पुष्पराज खन्ना यांना फोन करून माहिती दिली.
दरम्यान, मृत व्यक्ती ही बांधकाम व्यवसाय असून घरी आई - वडिल , बायको चोघेजण राहत होते. मयत व आरोपी यांचे ६ वर्षापूर्वी प्रेमविवाह झाला होता. आहे. आरोपीला वानवडी पोलिसांनी (Wanwadi Police) अटक करून चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. (Latest Marathi News)
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.