Pune Crime : ५ कोटी दे नाहीतर...; पुण्यातील नामांकित बिझनेसमॅनला पाकिस्तानमधून खंडणीचा फोन; शहरात खळबळ

Pune Businessman Receives Threatening Call from Pakistan : ३७ वर्षीय फिर्यादी हे पुण्यातील उच्चभ्रू परिसर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बोट क्लब रोड परिसरात राहतात. यातील पहिला फोन फेब्रुवारी महिन्यात फिर्यादी यांना आला होता.
Pune Boat Club Road area Businessman receives ransom call
Pune Boat Club Road area Businessman receives ransom call Saam TV News
Published On

पुणे : पुण्यात गुन्हेगारीचं प्रमाण प्रचंड प्रमाणात वाढत चाललं आहे. त्याचदरम्यान, शहरातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली. पुण्यातील एका नामांकित व्यावसायिकाला थेट पाकिस्तानातून धमकी आल्याचं समोर आलं. धक्कादायक बाब म्हणजे, या व्यावसायिकाकडून तब्बल ५ कोटी रुपयांची खंडणी मागितली असल्याचा प्रकार समोर आलाय. पुण्यातील उच्चभ्रू असलेल्या बोट क्लब रोड परिसरातील ही घटना असून ही खंडणी व्हॉट्सॲप मेसेजद्वारे मागण्यात आलीय.

३७ वर्षीय व्यावसायिकाने याबाबत पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली आहे. या प्रकरणी एका अनोळखी आणि अज्ञात मोबाईल धारकांवर कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनं पुण्यात एकच खळबळ उडाली आहे. सर्व व्यावसायिकांचं देखील टेन्शन आलंय.

Pune Boat Club Road area Businessman receives ransom call
Ashwini Bidre Court Hearing : कोणाला माफ करू नका! न्यायाधीशांसमोरच अश्विनी बिद्रेंची मुलगी ढसाढसा रडली, कोर्टात शांतता

मिळालेल्या माहितीनुसार, ३७ वर्षीय फिर्यादी हे पुण्यातील उच्चभ्रू परिसर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बोट क्लब रोड परिसरात राहतात. यातील पहिला फोन फेब्रुवारी महिन्यात फिर्यादी यांना आला होता. २५ फेब्रुवारी रोजी संबंधित फिर्यादी यांच्या मोबाईल वर पाकिस्तानातील +923498477642 या नंबर वरून व्हॉट्सॲप कॉल आला. +92 हा पाकिस्तान या देशाचा डायल कोड आहे. फिर्यादी यांना दुसरा फोन २६ फेब्रुवारी तर तिसरा फोन मार्चमध्ये आला. यावेळी सुद्धा फोन करणाऱ्यांनी पाकिस्तानच्या नंबरवरून फिर्यादी यांना व्हॉट्सॲप कॉल केले होते. या तिन्हीवेळा फिर्यादी यांना व्हॉट्सॲप मेसेज आणि व्हॉईस नोट पाठवून ५ कोटी रुपयांची खंडणीची मागणी करण्यात आली. इतकेच नाही तर त्यांना जीवे मारण्याची धमकी सुद्धा देण्यात आल्यामुळे फिर्यादी यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात नंबर धारकांवर गुन्हा दाखल केला आहे. सध्या या प्रकरणाचा तपास पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून सुरू आहे.

पश्चिम बंगालमध्ये गोळ्या घालून हत्या, महाराष्ट्रात येऊन लपला

पत्नीसोबत अनैतिक संबंधातून दोन तरुणांनी एका इसमाची गोळ्या झाडून हत्या केल्याची घटना पश्चिम बंगाल येथे घडली होती. या प्रकरणातील एका आरोपीला पश्चिम बंगाल पोलिसांनी बेड्या ठोकल्या होता तर दुसरा आरोपी सिराज शहा उर्फ कॅप्टन पसार झाला होता. पश्चिम बंगालचे पोलीस सिराजच्या मार्गावर होते सिराज डोंबिवली येथे लपून बसल्याची माहिती पश्चिम बंगाल पोलिसांनी मानपाडा पोलिसांनी दिली. मानपाडा पोलिसांनी तात्काळ सापळा रचत सिराज शहा याला पीसवली येथून बेड्या ठोकल्या. ओळख लपवण्यासाठी सिराज हा डोंबिवली एमआयडीसीमध्ये मजूर म्हणून काम करत होता. मानपाडा पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन पश्चिम बंगाल पोलिसांच्या ताब्यात दिलं आहे.

Pune Boat Club Road area Businessman receives ransom call
Ashwini Bidre Case : अश्विनी बिद्रे प्रकरणाचा फैसला कधी होणार? महत्वाची माहिती आली समोर, सुनावणीदरम्यान कोर्टात काय घडलं?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com