
पुणे : माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नीलकंठेश्वर पॅनलची बहुमताकडे वाटचाल सुरु आहे. त्यामुळे अजित पवारांच्या समर्थनात कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत रस्त्यावर एकच जल्लोष सुरु केला आहे. सध्या निळकंठेश्वर पॅनलच्या समर्थकांकडून जोरदार घोषणबाजीला सुरुवात झाली आहे. 'अरे सांगवीला सांगा, माळेगावला सांगा, चेअरमन आमचे अजितदादा.... अरे एकच वादा, अजितदादा... आला रे आला दादाच आला', अशा घोषणांनी माळेगाव कारखान्याचा परिसर दणाणून गेला आहे.
अजित पवार हे स्वत: माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. त्यांनी बारामतीत ठाण मांडून या निवडणुकीसाठी प्रचार केला होता. तसेच अजितदादांनी माळेगाव साखर कारखान्यासाठी ५०० कोटी रुपयांच्या आर्थिक मदतीची घोषणा केली होती. याचा अपेक्षित परिणाम मतदारांवर झालेला दिसत आहे. आज मतमोजणीच्या दुसऱ्या दिवशी अजित पवार यांच्या नेतृत्त्वाखालील निळकंठेश्वर पॅनेलची सरशी होताना दिसत आहे. २१ जागांपैकी १८ जागांवर अजित पवारांची आघाडी आहे. शरद पवारांच्या पॅनलचा सुपडा साफ झालेला आहे. तर सहकार बचाव पॅनलचे तीन उमेदवार आघाडीवर आहेत.
दरम्यान, ऊस उत्पादक पणदरे गटातील निकाल जाहीर झाला आहे. येथील तीनही जागा अजित पवारांकडे गेल्या आहेत. तर १२ जागी अजित पवार गटाचे निळकंठेश्वर पॅनलचे उमेदवार विजयी झाले आहेत.
पणदरे गट क्रमांक २ (विजयी उमेदवार)
तानाजी कोकरे (निळकंठेश्वर पॅनल) ८४९५
योगेश जगताप (निळकंठेश्वर पॅनल) ८६३५
स्वप्नील जगताप (निळकंठेश्वर पॅनल) ७९३३
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.