Pune : बायकोमुळे मित्राचा दारूस नकार, संतापलेल्या दोस्तांनी गाड्या पेटवल्या, कोथरूडमधील घटना

Pune crime News : मित्राने दारु पिण्यास नकार दिल्याने संतापलेल्या दोन मित्रांनी गाड्या पेटवल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे. कोथरूडमध्ये ही घटना घडल्याचे समोर आलेय. याप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल झालाय.
Pune crime News
Pune crime News
Published On

सचिन जाधव, पुणे प्रतिनिधी

Pune Kothrud News : दोन दिवसांपूर्वी धुळवड झाली, त्या दिवशी राज्यात अनेक घटना घडल्या आहेत. काही ठिकाणी नशेत असणाऱ्यांमुळे वाहनांचे अपघात झाले. तर कुठे धुळवडीनंतर अंघोळीसाठी गेलेल्यांचे बुडून मृत्यू झाला. धुळवडीला दारूच्या नशेत पुण्यात गाड्या पेटवल्याची घटना घडली आहे. धक्कादायक म्हणजे मित्राने दारू पिण्यास नकार दिल्यामुळे दोन मित्रांनी गाड्या पेटवून दिल्याचा प्रकार पुण्यातील कोथरूडमध्ये घडली आहे.

तरूणांच्या या कृत्यामुळे काही लोकांचे नुकसान झाले आहे. एका मित्राला त्याच्या पत्नीने दारु पिण्यासाठी जाण्यास नकार दिला. मित्राने सुद्धा पत्नीचे म्हणणे ऐकल्याने अन्य दोन मित्रांनी रागाच्या भरात काही दुचाकी पेटवल्याची घटना पुण्यात घडली आहे. पुण्यातील कोथरूडमधील राऊत वाडी, हनुमान नगर येथे ही घटना घडली आहे. याच ठिकाणी आरोपी मित्र ठाकूर आणि हिरालाल शर्मा सुद्धा वास्तव्यास आहेत. हे केवळ मित्र नसून नातेवाईक सुद्धा असल्याची माहिती देण्यात आली आहे. धुळवडीच्या दिवशी दोन्ही आरोपी मित्रांनी शिबुकुमारला दारु पिण्यासाठी बोलावले. पण त्याने मित्रांना नकार दिला. तसेच,पत्नी दारु पिण्याची परवानगी देत नसल्याने मी येणार नाही असे सागितले.

Pune crime News
Crime : बायकोचं मंगळसूत्र चोरलं, पाठलाग करणाऱ्या नवऱ्याला दगडाने ठेचला, अकोला हादरलं

शिबुकुमारने मित्रांना नकार देत घराचा दरवाजा लावून घेतला. बराच वेळ होऊनही शिबुकुमार घराबाहेर न आल्याने या दोघांनाही त्यांचा प्रचंड राग आला. शिबुकुमार पत्नीच्या सांगण्यावरून येत नसल्याने दोन्ही आरोपी मित्रांनी रागाच्या भरात त्याची दुचाकी पेटवली. या आगीत पार्किंगमधील इतर 2-4 दुचाकीसुद्धा जळून खाक झाल्या. इतर दुचाकींना आग लागल्याचे पाहताच आरोपींनी तिथून पळ काढला.

Pune crime News
Beed Crime: अनैतिक संबंधाचा संशय, २ दिवस डांबून ठेवलं; मारहाणीत तरुणाचा मृत्यू, बीडमध्ये पुन्हा खळबळ

ही घटना धुळवडीच्या दिवशी रात्री उशिराच्यावेळी घडली. कोथरूड पोलिसांना याबाबत गुन्हा दाखल केला आहे. शिबुकुमार ठाकूर यानेच त्याच्या मित्रांविरुद्ध फिर्याद दिली. त्यानंतर या प्रकरणी पोलिसांनी कणही ठाकूर (वय 28, व्यवसाय - सुतारकाम) आणि हिरालाल शर्मा (वय 24, व्यवसाय - सुतारकाम) या दोघांना अटक केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com