अक्षय बडवे
भोरच्या वरंधा घाटात मिनी बसला भीषण अपघात झाला आहे. बस ६० फूट दरीत कोसळली. या अपघातात चालकाचा मृत्यू झाला आहे. भोर महाड मार्गावरील वरंधा घाटातील वारवंड ते शिरगाव दरम्यान शिरगाव हद्दीत ही घटना घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी मध्यरात्री २ वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. बस रस्ता सोडून धरणाच्या बाजूला ५० ते ६० फूट खोल दरीत कोसळली. चालकाला रस्त्याचा अंदाज न आल्याने गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याची माहिती आहे. धरणाच्या पाण्यापासून ५ फुटावर गाडी अडकल्याने मोठा अनर्थ टळला.
अपघातात चालक अजिंक्य कोलते जखमी झाला होता. त्याचा उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे. गाडीत चालकासह १०-११ प्रवासी होते. ते सर्व प्रवासी सुखरुप आहेत. जखमींना भोर उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.