Pune Accident News: नवले चौकात दोन वाहनांवर उलटला सिमेंट ने भरलेला ट्रक, नियंत्रण सुटल्याने अपघात

Two People Seriously Injured: अपघातात दोन जण गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
Pune Accident News
Pune Accident NewsSaam Digital
Published On: 

Pune Accident News

कात्रजकडून नवलेच्या दिशेने येणाऱ्या रस्त्यावर नवले चौकात अचानक सिग्नल लागल्याने सिमेंट ने भरलेला ट्रक दोन वाहनांवर उलटल्याची घटना शनिवारी सकाळी १०.२० च्या सुमारास घडली. या अपघातात दोन जण गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कात्रजकडून येणार ट्रक नवलेच्या दिशेने जात होता. दरम्यान नवले चौकात गतिरोधकाच्या ठिकाणी अचानक सिग्नल लागला. मात्र ट्रक चालकाला ट्रकवर नियंत्रण मिळवता आला नाही. त्याने सिग्नलवर येऊन एकदम ब्रेक लावला. त्यामुळे ट्रक एका वाहनावर आणि दुचाकीवर उलटला. यात दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून उपचार सुरू आहेत. दरम्यान या अपघातात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.

Pune Accident News
Mumbai Crime News : मुंबईत बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश, चाैघांना अटक; फसवणूक झालेल्यांनी पाेलीसांत तक्रार द्यावी

अपघातानंतर नवले चौकातील वाहतूक काहीकाळ विस्कळीत झाली होती. चौकातील सिग्नल बंद करून वाहतूक सुरळीत करण्यात आली. दरम्यान क्रेनच्या साहाय्याने वाहने हटविण्याचे काम सुरू आहे. अपघातानंतर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला असून अधिक तपास सुरू आहे.

Pune Accident News
Junnar Crime News : अपहरण करुन युवकाच्या खुनाचा कट रचणा-या तिघांना अटक, ओतूर पोलीसांची कारवाई

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.