Pune Crime News: गर्भवती तरुणीची आत्महत्या, धक्कादायक कारण आलं समोर; प्रियकरासह चार जणांवर गुन्हा दाखल

प्रियकर संग्राम पानसरे, त्याची आई, मावशी व शेजारील एका महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
crime news
crime newsSaam TV
Published On: 

पुणे : पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. लग्नाला नकार दिल्याने २४ वर्षीय तरुणीने आत्महत्या केली आहे. मृत तरुणी गर्भवती असल्याची माहिती आता समोर येत आहे. तरुणीने राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली. पुण्यातील दत्तवाडीमध्ये ही घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी चार जणांवर गुन्हा दाखल केला आहे. (Crime News) 

crime news
Pune Crime : पुण्यात १५ वर्षीय मुलीवर सहा जणांचा सामूहिक बलात्कार; काळीमा फासणारी घटना

मिळालेल्या माहितीनुसार, मृत तरुणीचे संग्राम उर्फ पिट्या विलास पानसरे या तरुणासोबत प्रेमसंबंध होते. त्यातून तरुणी गर्भवती राहिली होती. परंतु हा गर्भ दुसऱ्याचा आहे,असे म्हणत आरोपीने तिच्याशी लग्न करण्यास नकार दिला. तर इतरांनी तिचा छळ केल्याचा आरोप करण्यात आला आहे.  (Latest Marathi News)

crime news
VIDEO : भरधाव कारने दुचाकीस्वारासह शाळकरी मुलींना उडवलं; थरकाप उडवणारी घटना CCTVत कैद

याच कारणामुळे तरुणीने टोकाचं पाऊल उचलत राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली आहे. याप्रकरणी प्रियकर संग्राम पानसरे, त्याची आई, मावशी व शेजारील एका महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पाच दिवसांपुर्वी हा प्रकार घडला असून, अंत्यविधी झाल्यानंतर पोलिसांत तक्रार करण्यात आली आहे. पुढील तपास दत्तवाडी पोलीस करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com