Ambedkar Vs Gandhi : लोकसभा निवडणुकीत मोठा ट्विस्ट; आंबेडकर विरुद्ध गांधी यांच्यात रंगणार सामना
Ambedkar Vs GandhiSaam tv

Ambedkar Vs Gandhi : लोकसभा निवडणुकीत मोठा ट्विस्ट; आंबेडकर विरुद्ध गांधी यांच्यात रंगणार सामना

prakash ambedkar vs tushar Gandhi in akola : अकोला लोकसभा मतदारसंघाच्या मोठा ट्विस्ट आला आहे. या लोकसभा मतदारसंघात प्रकाश आंबेडकर यांच्या विरोधात तुषार गांधी मैदानात उतरले आहेत.

नितीन पाटणकर, पुणे

prakash ambedkar vs tushar Gandhi :

लोकसभा निवडणुकीत उमेदवारांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. लोकसभेच्या या निवडणुकीत उमेदवारांनी सभांचा धडाका लावला आहे. या लोकसभा निवडणुकीत अकोला मतदारसंघातील निवडणुकीकडेही सर्वांचं लक्ष लागलं आहे. या लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट आला आहे. या लोकसभा मतदारसंघात प्रकाश आंबेडकर यांच्या विरोधात तुषार गांधी मैदानात उतरले आहेत.

अकोला लोकसभा मतदारसंघात निवडणुकीत वेगळा ट्वीस्ट समोर आला आहे. या मतदारसंघात आंबेडकर विरुद्ध गांधी एकमेकांच्या समोर उभे ठाकले आहेत. प्रकाश आंबेडकर यांच्या विरोधात तुषार गांधी मैदानात उभे ठाकले आहेत.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नातू प्रकाश आंबेडकर यांच्या विरोधात महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी मैदानात उभे ठाकले आहेत. 'वंचित बहुजन आघाडीला मतदान कर नका. प्रकाश आंबेडकर आणि त्यांच्या उमेदवारांना मतदान करू नका, असं आवाहनही तुषार गांधी यांनी केला आहे. वंचित भाजपची बी टीम, एमआयएम देखील भाजपची बी टीम आहे, असा तुषार गांधी यांचा आरोप आहे.

Ambedkar Vs Gandhi : लोकसभा निवडणुकीत मोठा ट्विस्ट; आंबेडकर विरुद्ध गांधी यांच्यात रंगणार सामना
Akola Politics: १० वर्षांत काय केलं? मतदान का करायचं? ग्रामस्थांनी भाजप उमेदवाराला विचारला जाब

महाराष्ट्रातील मतदारांना आवाहन करण्यासाठी तुषार गांधी यांच्याकडून प्रोग्रेसिव महाराष्ट्र मंचची स्थापना केली. महाविकास आघाडीला मतदान करा, महायुतीला मतदान करु नका हे आवाहन करण्यासाठी प्रोग्रेसिव महाराष्ट्राची स्थापना करण्यात आली आहे. अनेक सामाजिक कार्यकर्ते, साहित्यिक , चित्रपट कलावंत यांचा प्रोग्रेसिव महाराष्ट्राच्या भूमिकेला पाठिंबा आहे.

Ambedkar Vs Gandhi : लोकसभा निवडणुकीत मोठा ट्विस्ट; आंबेडकर विरुद्ध गांधी यांच्यात रंगणार सामना
Akola News : बोटावरची शाई दाखवा आणि करा मोफत हेअरकट; मतदानासाठी अकोल्यात हेअरसलून व्यावसायिकाचा उपक्रम

तुषार गांधी या मंचाच्या माध्यमातून राज्यभर फिरुन मतदारांना आवाहन करणार आहेत. तसेच सोशल मीडियावरुन मतदारांना आवाहन करणार आहेत. महायुती बरोबरच वंचित, एमआयएमला देखील मतदान न करण्याचे आवाहन करणार आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com