Ram Mandir Inauguration
Ram Mandir InaugurationSaam TV

Ram Mandir Inauguration: मावळमध्ये ५१ फूट प्रभू श्री रामांची नयनरम्य रांगोळी; दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी

Shree Ram Rangoli: दोन्ही कलाकारांच्या चेहऱ्यावर दिसून येतोय. तर चित्रकलेच्या माध्यमातून अनेक चित्र साकारलेपरंतु रांगोळी काढण्याची ही पहिलीच वेळ आणि ती देखील ५१ फुटांची असल्याने ती यशस्वीरित्या साकारली गेली.
Published on

दिलीप कांबळे

Maval News:

प्रभू रामचंद्रांच्या अयोध्या येथे होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्ताने देशभरात आनंदोत्सव साजरा केला जात आहे. प्रत्येक रामभक्त वेगवेगळ्या संकल्पना राबवत आहेत. मावळमधील रामभक्त संकेत खळदे यांनी देखील सोसायटीच्या ओपन टेरेसवर प्रभू रामचंद्र यांची ५१ फुटी रांगोळी साकारली आहे.

Ram Mandir Inauguration
Ayodhya Ram Mandir: प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी अयोध्या सज्ज, फुलांनी आणि दिव्यांनी सजली रामाची नगरी

भव्य रांगोळी काढण्यासाठी रोहित चव्हाण आणि कमलेश पाटील या दोन कलाकारांनी तब्बल २६ तासांत ही रांगोळी साकारली आहे. यासाठी त्यांना तीनाशे किलो रांगोळी लागली. साक्षात श्रीराम साकारल्याचा आनंद या दोन्ही कलाकारांच्या चेहऱ्यावर दिसून येतोय. तर चित्रकलेच्या माध्यमातून अनेक चित्र साकारलेपरंतु रांगोळी काढण्याची ही पहिलीच वेळ आणि ती देखील ५१ फुटांची असल्याने ती यशस्वीरित्या साकारली गेली.

तर अयोध्या नगरीत राम अवतरणार आहेत त्याआधीच प्रभू श्रीराम मावळातील मंत्रा सिटीत अवतरले असल्याने मावळ पंचक्रोशीतील नागरिक आता राम लल्लाच्या दर्शनासाठी गर्दी करू लागले आहेत. आलेल्या प्रत्येक नागरिकामुळे परिसर जय श्रीरामाच्या घोषात दुमदुमून गेला आहे.

मावळच्या नऊ लाख उंबरे गावातील श्रीराम मंदिरावर केली विद्युत रोषणाई आणि फुलांची सजावट

मावळच्या नऊलाख उंबरे येथील प्रभू श्रीरामांचे पुरातन मंदिरात आयोध्या येथे होणाऱ्या प्रभू श्रीराम मूर्ती स्थापना व प्राणप्रतिष्ठा निमित्त श्रीराच्या मंदिराला विधुत रोषणाई तसेच फुलांची सजावट करण्यात आली आहे. गेल्या पाच दिवसांपासून कीर्तन आरती भजन सुरू असून राम लल्लाच्या आगमनासाठी संपूर्ण गाव सज्ज झाले आहे.

Ram Mandir Inauguration
Ram Mandir : राम मंदिर लोकार्पण सोहळ्याला लालकृष्ण अडवाणी जाणार नाहीत; शेवटच्या क्षणी रद्द केला कार्यक्रम

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com