Ayodhya Ram Mandir: प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी अयोध्या सज्ज, फुलांनी आणि दिव्यांनी सजली रामाची नगरी

Ram Mandir News: सोमवारी राम मंदिरात होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी अयोध्या शहर सज्ज झाले असून या सोहळ्याच्या धार्मिक विधीमध्ये पंतप्रधान मोदी प्रमुख यजमान म्हणून सहभागी होणार आहेत.
Ayodhya Ram Mandir
Ayodhya Ram MandirSaam Tv
Published On

Ayodhya Ready for Ram Mandir Inauguration:

सोमवारी राम मंदिरात होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी अयोध्या शहर सज्ज झाले असून या बहुप्रतिक्षित सोहळ्याच्या धार्मिक विधीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रमुख यजमान म्हणून सहभागी होणार आहेत. श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठेच्या दुसऱ्याच दिवशी हे मंदिर सर्वसामान्यांसाठी खुले करण्यात येणार आहे.

22 जानेवारी (सोमवार) रोजी दुपारी 12.20 वाजता प्राणप्रतिष्ठा सोहळा सुरू होईल आणि दुपारी 1 वाजेपर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे. यानंतर पंतप्रधान कार्यक्रमस्थळी संत आणि प्रतिष्ठित व्यक्तींसह 7,000 हून अधिक लोकांच्या मेळाव्याला संबोधित करतील. (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Ayodhya Ram Mandir
Mukesh Ambani House: मुकेश अंबानींचे घर अँटिलिया झालं राममय, पाहा सुंदर PHOTO

श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या म्हणण्यानुसार, रविवारी श्रीरामाच्या मूर्तीला विविध तीर्थक्षेत्रांवरून आणलेल्या पवित्र पाण्याने भरलेल्या 114 मडक्यांनी स्नान घालण्यात आले. ट्रस्टच्या एका सदस्याने सांगितले की, “आज ही मूर्ती मध्याधिवासात ठेवण्यात आली होती. आजपासून रात्री जागरण अधिवास सुरू होणार आहे. यज्ञशाळेत श्रीरामाच्या जुन्या मूर्तीची पूजा केली जात आहे. (Latest Marathi News)

त्यांनी सांगितलं की, चेन्नई आणि पुण्यासह अनेक ठिकाणांहून आणलेल्या फुलांनी विधी केली जात आहे. ते म्हणाले, ''आज मंदिर ट्रस्टचे सदस्य अनिल मिश्रा त्यांच्या कुटुंबासह, विहिंपचे प्रमुख आर. एन. सिंह आदी धार्मिक विधी करत आहेत.''

Ayodhya Ram Mandir
राज्यभरात श्रीराम नामाचा गजर; मुंबई, पुणे, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापुरात मिरवणूक आणि विविध कार्यक्रमांचं आयोजन

प्राणप्रतिष्ठा सोहळ्याशी संबंधित विधी 16 जानेवारी रोजी सरयू नदीपासून सुरू झाली. जी सोमवारी दुपारी अभिजीत मुहूर्तावर पूर्ण होईल. समारंभासाठी आमंत्रित केलेले काही लोक रविवारी अयोध्येत पोहोचले तर काही सोमवारी सकाळी पोहोचण्याची शक्यता आहे. लाखो लोक हा कार्यक्रम टेलिव्हिजन आणि ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर थेट पाहणार आहेत.

या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारसह अनेक राज्य सरकारांनी अर्ध्या दिवसाची सुट्टी जाहीर केली आहे. प्रभू रामाचे जन्मस्थान असलेल्या अयोध्येत रविवारी सोहळ्याच्या तयारीला अधिकाऱ्यांनी अंतिम रूप दिले. यासोबतच देश-विदेशातही यानिमित्ताने विशेष उत्सव जाहीर करण्यात आला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com