सोमवारी आयोध्या इथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रभू रामाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना होणार आहे. या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशासह राज्यातही राममय वातावरण तयार झाले आहे.
यातच अयोध्या नगरीत उभारण्यात आलेल्या भव्य मंदिरामध्ये श्रीरामाच्या मूर्तीचे प्रतिष्ठापना करण्यासाठी अवघे काही तास उरले असतानाच मुंबईत ओशिवरा मेट्रो स्थानकाजवळ भाजपाचे उत्तर भारतीय मोर्चाचे अध्यक्ष संजय पांडे यांच्या माध्यमातून भव्य असे 50 फुटी राम मंदिर प्रतिकृती उभारण्यात आली आहे. यानिमित्ताने कलश यात्रा, होम हवन आणि रामलीला अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे आज भाजपाचे आमदार आशिष शेलार यांनी या मंदिराच्या प्रतिकृतीला भेट देऊन श्रीरामाचे दर्शन घेतले. आज सकाळपासूनच या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर राम भक्तांनी दर्शन घेण्यासाठी गर्दी केल्याचे देखील चित्र पाहायला मिळत आहे. (साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
श्रीरामचंद्राच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पूर्वसंध्येला छत्रपती संभाजीनगरमध्ये शहरातील विविध भागांमधल्या मंदिरावर विद्युत रोषणाई करण्यात आली असून ठिकठिकाणी मोठमोठे आकाशकंदील देखील लावण्यात आलेय. यामुळे शहरातील वातावरण हे राममय झालं असून नागरिकांनी भगवे ध्वज आणि रुमाल घेण्यासाठी दुकानावर मोठी गर्दी केली असल्याचं पाहायला मिळत आहे. (Latest Marathi News)
दगडूशेठ मंदिरा समोर फुलांनी सजावट केलेली अक्षर जय श्रीराम अस फुलांनी लिहिण्यात आलं आहे. तर फुलांमध्येच आयोध्यामधील श्रीराम मंदिर, भगवान श्रीराम, सीता, लक्ष्मण, हनुमान यांची चित्र काढण्यात आली आहेत. ती पाहण्यासाठी लोकांचे आतापासूनच गर्दी पाहायला मिळत आहे.
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार राजन विचारे यांच्या वतीने प्रभू श्रीरामांचा रामरथ मिरवणूक, पालखी व दिंडीचे आयोजन करण्यात आले आहे. या दिंडीचा प्रारंभ वारकरी भवन, राम मारुती रोड, नौपाडा येथून होणार आहे. ही दिंडी श्री गजानन महाराज मंदिर, जुना मुंबई रस्ता मार्गे, घंटाळी रोड श्री साईबाबा मंदिर, घंटाळी देवी मंदिर, सामंत ब्लॉक्स, राम मारुती रोड मार्गे न्यू गर्ल्स, न्यू इंग्लिश स पु.ना. गाडगीळ, राजवंत ज्वेलर्स, मासुंदा तलाव, मराठी ग्रंथ संग्रहालय बाजारपेठ रोड, श्री कोपनेश्वर मंदिर, अशी जाणार आहे.
कोल्हापूर शहरात आज भव्य शोभायात्रा काढण्यात आलेली आहे. कोल्हापुरातील ऐतिहासिक बिंदू चौक परिसरातून या शोभा यात्रेला सुरुवात झाली. दसरा चौक परिसरात या शोभा यात्रेचा समारोप होत आहे. भगवे झेंडे हातात घेऊन कोल्हापूरकर या शोभायात्रेत सहभागी झाले असून पारंपारिक वाद्यांचा गजर फुलांचा वर्षाव आणि आतषबाजी हे या शोभा यात्रेचे प्रमुख आकर्षण होतं.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.