Political News : BMC निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला मोठा धक्का; २ नगरसेवकांचा CM एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश

Political News : ठाणे येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेचा कार्यकर्ता मेळावा झाला.
BMC
BMC Saam Tv
Published On: 

Mumbai News : आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसचे मुंबईतील माजी नगरसेवक सुनील मोरे आणि त्यांच्या पत्नी माजी नगरसेविका सुप्रिया मोरे यांनी आजा शिवसेना (शिंदे गटात) प्रवेश केला आहे.

ठाणे येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेचा कार्यकर्ता मेळावा झाला. या मेळाव्यात सुनील मोरे आणि सुप्रिया मोरे यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.

मुख्यमंत्र्यांच्या महाराष्ट्र दौऱ्याचा शुभारंभ

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या राज्यव्यापी दौऱ्याचा ठाण्यामधून आज शुभारंभ झाला आहे. लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, शिवसैनिक यांचा आज ठाण्यात कार्यकर्ता मेळावा पार पडला. (Latest Political News)

BMC
Devendra Fadnavis Speech : अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यासोबतच्या मैत्रीत फरक काय? फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेचे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, शिवसैनिक यांचे मेळावे आगामी काळातही आयोजित केले जाणार आहेत. या महाराष्ट्रव्यापी दौऱ्याची सुरुवात शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यातून झाली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, शिवसैनिक यांना मार्गदर्शनही केलं. (Breaking News)

BMC
Devendra Fadnavis News : उद्धव ठाकरेंनी खोटी शपथ घेतली, देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पहिल्या टप्प्यात पुणे, कोल्हापूर, नवी मुंबई येथे मेळावे घेणार आहेत. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महायुतीतील एन्ट्रीनंतर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेमध्ये मोठी अस्वस्थता असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. या संपूर्ण राजकीय परिस्थितीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना नेमके कोणते मार्गदर्शन करतात हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.