Mumbai Crime News: पोलिसानं अंतर्वस्त्रात लपवलं होतं चरस; आर्थर रोड कारागृहातील धक्कादायक घटना

Arthur Road jail News: पोलीस हवालदाराकडे ७० ग्रॅमचे चरस सापडलेय. हवालदारावर गुन्हा दाखल करत त्याला ताब्यात घेण्यात आलंय.
Mumbai Crime News
Mumbai Crime NewsSaam TV
Published On: 

Arthur Road News:

येरवडा कारागृहासह विविध बालसुधारगृहांमध्ये अंमली पदार्थांची तस्कारी होत असल्याच्या अनेक घडना घडल्या आहेत. अशात आता मुंबईच्या आर्थर रोड कारागृहातून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. एका पोलीस हवालदाराकडे ७० ग्रॅमचे चरस सापडलेय. हवालदारावर गुन्हा दाखल करत त्याला ताब्यात घेण्यात आलंय. (Latest Marathi News)

Mumbai Crime News
Mumbai Crime: जे जे रुग्णालयात तरुणीसोबत सफाई कामगाराचे संतापजनक कृत्य; पोलिसांनी ठोकल्या बेड्या

विवेक असं अटक झालेल्या पोलिसाचं नाव आहे. गेल्या २ वर्षांपासून तो आर्थर रोड कारागृहात कर्तव्यावर होता. ६ ऑक्टोबर रोजी त्याची रात्रपाळी होती. त्यामुळे सायंकाळी ६ च्या सुमारात तो कर्तव्यावर हजर झाला. यावेळी हवालदाराच्या हलाचाली सामान्य नव्हत्या. दीपक सावंत हे हवालदारही यावेळी कर्तव्यावर हजर होते. विवेकच्या हालचालींचा संशय आल्यावर दीपक यांनी त्यांना रंगे हात पकडलं.

दीपक हवालदारांना विवेक यांची झडती घेण्यास सुरुवात केली. मात्र अंगझडतीसाठी विवेकने नकार दिला. यामुळे संशय आणखीन बळावला त्यामुळे अंगझडती घेतली असता विकेकच्या अंतर्वस्त्रात तब्बल ७० ग्रॅम चरस सापडले.

आपलं भांडं फुटलं समजल्यावर विवेकने पळ काढण्यासाठी दीपक यांच्या हाताचा चावा घेतला आणि पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र यात तो अयशस्वी ठरला. सध्या विवेक पोलिसांच्या ताब्यात असून या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे.

Mumbai Crime News
Gondia Crime News: अवघ्या ६० रुपयांंचा वाद... जिवलग मित्रानेच मित्राला संपवले; गोंदियात खळबळ

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com