
नव्या 'हिट अँड रन' कायद्याच्या विरोधात ट्रक चालकांनी संप पुकारला आहे. गेल्या दोन दिवसांपासून राज्यभरातील ट्रक चालक संपावर आहेत. या संपात इंधन ट्रक चालकांनी देखील सहभाग नोंदवला आहे. यामुळे मुंबईसह राज्यभरात पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा झाल्याची अफवा वाऱ्यासारखी पसरली. या अफवेमुळे मुंबईतही पंपावर पेट्रोलसाठी वाहनधारकांनी लांबच लांब रांगा लावल्या. त्यामुळे काही पेट्रोल पंपावर गोंधळाचीही स्थिती पाहायला मिळाली. या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी मुंबईत पेट्रोल आणि डिझेल पुरेसं आहे. अफवांवर विश्वास ठेवू नका, असं आवाहन नागरिकांना केलं आहे. (Latest Marathi News)
मुंबईत पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा निर्माण होणार असल्याच्या अफवेमुळे पेट्रोल आणि डिझेलसाठी पंपावर वाहनधारकांची मोठी गर्दी होत आहे. पंपावर वाहनधारकांची लांबच लांब रांगा लागल्या आहेत. यामुळे मुंबईच्या रस्त्यावर वाहतूक कोंडी देखील होऊ लागली आहे. मुंबई पोलिसांनीही 'एक्स' अकाऊंटवर पोस्ट करत वाहनधारकांना पंपावर गर्दी न करण्याचं आवाहन केलं आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
मुंबई पोलिसांनी 'एक्स' अकाऊंटवर पोस्ट करत म्हटलं की, 'मुंबईमध्ये पेट्रोल, डिझेल व सीएनजी यांची कमतरता भासणार नाही, याची आम्ही योग्य ती काळजी घेत आहोत. मुंबईमध्ये या इंधनाचा पुरेपूर साठा उपलब्ध आहे. त्यामुळे समाजमाध्यमांमध्ये पसरत असलेल्या कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये.
'नागरिकांनी पंपावर पेट्रोल व डिझेल भरण्याकरिता गर्दी करणे टाळावे ही विनंती. तसेच आम्ही या इंधनांची वाहतूक करणाऱ्या टँकर्सना पूर्ण सुरक्षा पुरवत आहोत. आपणास विनंती आहे की ही माहिती आजूबाजूच्या इतरांना सुद्धा कळवा, असे मुंबई पोलिसांकडून सांगण्यात आले.
ट्रक चालकांच्या संपाच्या पार्श्वभूमीवर मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची केंद्रीय गृह सचिवासोबत बैठक झाली. या बैठकीनंतर गृह सचिव अजय भल्ला यांनी सांगितले की, नवा हिट अँड रनबाबतचे नियम अद्याप लागू होणार नाहीत. वाहनचालकांना कामावर परत यावं. १० वर्षे तुरुंगवास आणि दंडाचा कायदा अद्याप लागू होणार नाही'.
'आम्ही भारतीय न्यायिक संहितेतील तरतुदींबाबत सविस्तर चर्चा केली आहे. ट्रक चालकांच्या सर्व मुद्द्यावर तोडगा निघाला आहे. नवीन कायद्याची अंमलबजावणी अद्याप झालेली नाही. तसेच एआयएमटीसीशी चर्चा करूनच हा कायदा लागू केला जाईल,असेही ते म्हणाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.