Kalyan News: कल्याण पोलिसांकडून नवीन वर्षाचं नागरिकांना गिफ्ट, चोरीला गेलेला 3 कोटी 16 लाखांचा ऐवज केला परत

Kalyan Police: पोलीस वर्धापन दिन सप्ताह निमीत्ताने कल्याण परिमंडळ तीन अंतर्गत मुद्देमाल हस्तांतरण व सेल्फ हेल्प डेस्क लोकार्पण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
Kalyan News
Kalyan NewsSaam Tv
Published On

>> अभिजित देशमुख

Kalyan News:

पोलीस वर्धापन दिन सप्ताह निमीत्ताने कल्याण परिमंडळ तीन अंतर्गत मुद्देमाल हस्तांतरण व सेल्फ हेल्प डेस्क लोकार्पण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात चोरी, दरोडा, घरफोडी, फसवणूक अशा अनेक गुन्ह्यांची उकल करत गुन्ह्यांमधील चोरी गेलेले सोन्याचे दागिने, रोख रक्कम, मोबाईल, वाहने असा सुमारे 3 कोटी रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी चोरट्यांकडून मिळविला असून या मुद्देमालाची त्या त्या ग्राहकांना मंगळवारी पोलीस आयुक्त आशुतोश डुंबरे यांच्या हस्ते परत करण्यात आले.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Kalyan News
Truck Drivers Protest: ट्रकचालकांच्या बाबतीत आणलेला कायदा म्हणजे पोलिसी राज्य आणण्याचा व्यापक कट: जितेंद्र आव्हाड

यावेळी सह पोलीस आयुक्त दत्तात्रय कराळे,अपर पोलिस आयुक्त दत्तात्रय शिंदे ,पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ यांच्यासह पोलीस अधिकारी उपस्थित होते. यावेळी ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्या हस्ते सेल्फ हेल्प डेस्क चे लोकार्पण करण्यात आले. यावेळी कल्याण सहाय्यक पोलिस आयुक्त कल्याणजी घेटे, डोंबिवलीचे सुनिल कुराडे, वरिष्ठ पोलिस निरिक्षक अशोक होनमाणे, अशोक कडलग, सर्जेराव पाटील, राजेश शिरसाठ, नितीन गीते, उमेश गीते, मोहन खंदारे, शैलेंद्र साळवी यांसह इतर पोलिस अधिकारी उपस्थित होते. ज्या नागरीकांना हा मुद्देमाल परत केला गेला. त्यांच्या चेहऱ्यावर समाधानासह आनंद पाहावयास मिळाला. अनेकांनी पोलिसांच्या या कामगिरीचे आभार मानले.  (Latest Marathi News)

रोख रक्कमेच्या स्वरुपातील 27 लाख 80 हजार रुपये, सोन्या चांदीच्या स्वरुपातील 1 कोटी 15 लाख 40 हजार रुपये, चोरीस गेलेली 51 वाहने त्याची किंमत 1 कोटी 4 लाख 52 रुपये, चोरीस गेलेले 351 मोबाईल त्याची किंमत 43 लाख 56 हजार रुपये आणि इतर 25 लाख 48 हजार रुपयांचा मुद्देमाल आहे .

Kalyan News
Ajit Pawar News : लातूर-बार्शी-टेंभूर्णी राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणाच्या कामाला गती येणार, अजित पवारांचे अधिकाऱ्यांना निर्देश

कल्याण पोलिस परिमंडळाच्या हद्दीतील आठही पाेलिस ठाण्यात सेल्फ हेल्प डेस्क हा अभिनव उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. या उपक्रमाला नागरीकांचा कसा प्रतिसाद मिळतो. ते पाहून हा उपक्रम ठाणे पोलिस आयुक्तालयाच्या सर्व पोलिस ठाण्यात सुरु करण्यात येईल, असे ठाणे पाेलिस आयुक्त आशूतोष डुंबरे यांनी येथे सांगितले.सेल्फ हेल्प डेस्क हा उपक्रम सुरु करण्यात यावी ही संकल्पना कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची होती. या सेल्फे डेस्कच्या माध्यमातून सायबर गुन्ह्याची तक्रार, मोईल हरविल्याची तक्रार, ठाणे पोेलिस आयुक्तालयाची माहिती, चारित्र्य पडताळणीचा अर्ज, पोलिस विभागाशी संबंधित तक्रारी नागरीकांना करता येणार आहेत अशी माहिती कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच पोलिस उपायुक्त सचिन गुंजाळ यांनी यावेळी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com