पीएमपीएमएल महिला कंडक्टरने 3 पुरुषांना हनीट्रॅपमध्ये अडकवले
खोट्या गुन्ह्याची धमकी देऊन खंडणी उकळल्याचा महिलेवर आरोप
भारती विद्यापीठ पोलिसांनी महिलेविरोधात गुन्हा दाखल करत केली अटक
पीएमपीएमएल प्रशासनाने आरोपी महिलेला निलंबित केलं
हनीट्रैपच्या माध्यमातून फसवणूक करणाऱ्या पीएमपीएमएलच्या एका महिला कंडक्टरला निलंबित करण्यात आले आहे. पीएमपीएमएलच्या पुणे स्टेशन आगारातील महिला वाहक कर्मचारीने तिघांची फसवणूक केली आणि त्यांच्याकडून खंडणी वसूल केली. या महिला कंडक्टरने आर्थिक फायद्यासाठी स्वत:च्या शरीराचा वापर करून रोहित संजय कदम, मनोज सुकणे आणि भगवान इबिते यांची मोठी फवणूक केली. या महिलेने आर्थिक पिळवणूक करून त्यांच्याकडून मौल्यवान वस्तू आणि रोख रक्कम अशी खंडणी उकळली.
या बाबतच्या भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यामध्ये १७ सप्टेंबरला महिला कंडक्टरविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या महिलेविरोधात बलात्काराची खोटी केस करण्याची धमकी देणे, खंडणीची मागणी करणे तसेच रोहित कदम यांच्याविरूध्द पोलिस स्टेशनमध्ये खोटी तक्रार करणे या सर्व आरोपांबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस तपास करत आहेत.
आरोपी महिला कंडक्टरविरोधात दाखल केलेल्या गंभीर गुन्ह्याचे स्वरूप पाहता तिच्यावर पोलिसांनी अटकेची कारवाई केली. या गंभीर गुन्ह्याचे स्वरूप पाहता भारती विद्यापीठ पोलिसांनी महिलेविरोधात तात्काळ कारवाई केली. त्यानंतर या महिलेने हनीट्रॅपच्या माध्यमातून केलेली फसवणूक आणि दाखल गुन्हा तसेच अटक कारवाई विचारात घेवून पीएमपी महामंडळ प्रशासनाकडून चौकशीसाठी महिलेला निलंबित करण्यात आले आहे. याबाबत आज पीएमपीएमएल प्रशासनाने निलंबन पत्र काढले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.