PMPML Mobile App: तिकीटासह पासची सेवाही अ‍ॅपवर; पीएमपी ॲपमुळे पुणेकरांचा प्रवास झाला सोपा

PMPML Mobile App: पीएमपीएमएलचे मोबाईल अ‍ॅप ऑनलाइन तिकिटे, बस पास, रिअल-टाइम ट्रॅकिंग आणि मार्ग कोणता आहे, याची माहिती मिळते. पुण्यातील प्रवाशांचा प्रवास सोपा आणि सुखकर झालाय.
PMPML Mobile App:
Commuters using the PMPML mobile app for ticket booking and real-time bus tracking in Pune.saam tv
Published On
Summary
  • पीएमपी मोबाइल ॲप ऑगस्ट २०२४ मध्ये सुरू

  • तिकीट आणि पास दोन्ही सुविधा एका ॲपवर

  • ४ कोटी प्रवाशांनी ॲपवरून तिकीट काढलं

पीएमपीने ‘आपली पीएमपी मोबाइल ॲप’ ऑगस्ट २०२४ मध्ये सुरू करण्यात आलेल्या अॅपमुळे पुणेकरांचा प्रवास सुखकर झालाय. पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या मोबाइल ॲपला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. मागील वर्षात ॲपवरून चार कोटी प्रवाशांनी तिकीट काढले. त्यामधून पीएमपीला ८६ कोटी रुपये मिळाले आहेत. मोबाइल ॲपमुळे प्रवाशांबरोबरच पीएमपी प्रशासनाची मोठी सोय झाली आहे.

प्रवाशांचा प्रवास सुलभ होण्यासाठी हे ॲप आणण्यात आले आहे. यातून रिअल-टाइम बस ट्रॅकिंग, रूट मार्गदर्शन, ऑनलाइन तिकीट बुकिंग, पास व्यवस्थापन यांसारख्या अत्याधुनिक सुविधा देण्यात येतात. या ॲपवर प्रवाशांना त्यांची बस थांब्यावर किती वेळात येणार यासह मार्गाचीही माहिती मिळते.

दरम्यान पीएमपीने ‘आपली पीएमपी मोबाइल ॲप’ ऑगस्ट २०२४मध्ये सुरू आणलं होतं. सुरुवातीला डाउनलोड करण्याचे प्रमाण कमी होते. परंतु हे ॲपमधून मिळणाऱ्या सुविधांची माहिती झाल्यानंतर प्रवाशांचा प्रतिसाद वाढत गेला. या मोबाइल ॲपवरून तिकीट व पास देखील काढता येतो.

PMPML Mobile App:
Pune-Satara Travel: पुणे- सातारा प्रवास होणार सुसाट! ४५ मिनिटांचा प्रवास ७ मिनिटांत; कसा आहे नवा मार्ग?

दरम्यान जवळपास २५ लाख या ॲपचे डाउनलोड झाले आहेत. आयफोन युझर्ससुद्धा हे अॅप वापरत आहेत. त्यांची संख्या दोन लाखांवर आहे. आपली पीएमपी मोबाइल या ॲपवरून दररोज १ लाख तिकीटे काढली जात आहेत. तर २० ते २५ हजार प्रवासी ॲपवरून पास काढत आहेत. त्यातून पीएमपीला दिवसाला २५ लाख रुपयांचे उत्पन्न मिळत आहे. पीएमपीच्या ॲपवरून तिकीट काढणाऱ्या प्रवाशांची संख्या आणि त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नात २०२५ या वर्षात लक्षणीय वाढ झाली आहे.

जानेवारी ते डिसेंबर २०२५ या कालावधीतील आकडेवारीनुसार एकूण ४ कोटी सात लाख ३० हजार २५ प्रवाशांनी ॲपच्या माध्यमातून तिकीट खरेदी केली आहे. त्यातून ८६ कोटी ८० लाख ७६ हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. जानेवारी २०२५मध्ये ३१ लाख ३७ हजार प्रवाशांनी ॲपवरून तिकीट काढली. यातून ५ कोटी ३८ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले होते.

PMPML Mobile App:
Pune news : पुण्यात राडा! नगरसेविकेच्या भावाला बेदम मारहाण, भाजप कार्यकर्त्यांवर गुन्हा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com