

खंबाटकी घाटातील धोकादायक वळण आता इतिहासजमा
४५ मिनिटांचा प्रवास होणार फक्त ७ मिनिटांत
दोन तीन पदरी बोगद्यांचे काम ९० टक्के पूर्ण
अपघात कमी होऊन वाहतूक अधिक सुरक्षित होणार
पुणे ते सातारा प्रवास करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. पुणे ते सातारा प्रवास आता आणखी सुसाट आणि कमी वेळाचा होणार आहे. खंबाटकी घाटावरील धोकादायक एस आकाराचे वळण आता इतिहासजमा होणार आहे. कारण खंबाटकी घाटातील नवीन बोगद्याचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. हा पूल लवकरच नागरिकांच्या सेवेत येणार आहे. त्यामुळे ४५ मिनिटांचा प्रवास फक्त ७ मिटांत होणार आहे.
पुणे-सातारा मार्गावर खंबाटकी घाटामध्ये दोन नवीन बोगद्याचे काम करण्यात आलले आहे. हे दोन्ही बोगते तीन पदरी असणार आहे. या बोगद्यांचे बांधकाम ९० टक्के पूर्ण झाले आहे. या बोगद्यांचे काम गेल्या ६ वर्षांपासून सुरू आहे. महत्वाचे म्हणजे, सातारा- पुणेला जोडणारा बोगदा शनिवारी वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. बोगद्याच्या उतारावरील पुलाचे बांधकाम अद्याप पूर्ण झाले नाही. प्रयोग म्हणून हलक्या वाहनांना वाहतूक करण्यास परवानगी देण्यात आली आहे. यामुळे अंदाजे २० ते २५ मिनिटे वाचत आहेत.
पुणे-सातारा महामार्गावरील खंबाटकी घाटावरील सर्वात धोकादायक एस आकाराचे वळण होते. खंबाटकी घाटातील रस्ता हा तीव्र चढण आणि वळणावळणाचा आहे. त्यामुळे घाटामध्ये अपघातांचे प्रमाण वाढले होते. एखादा अपघात झाला तर घाटात मोठी वाहतूक कोंडी होते. सध्या पुणे-सातारा रस्ता घाटातून जात असल्याने काही भागात हा दुहेरी रस्ता आहे ज्यामुळे वाहतूक मंदावते. या घाटात वाहतूक कोंडी नेहमी होते. आठवड्याच्या शेवटी आणि सुट्टीच्या दिवशी वाहतूक कोंडी प्रचंड वाढते.
खंबाटकी घाटात होणारे अपघात आणि वाहतूक कोंडी लक्षात घेता घाट रस्त्यावर पर्यायी मार्गाचा विचार करण्यात आला होता. यामुळे धोकादायक वळण दूर करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने दोन नवीन बोगदे बांधण्यास मान्यता दिली. मंजुरीनंतर फेब्रुवारी २०१९ मध्ये काम सुरू झाले. कोविडमुळे हे काम मंदावले आणि काही काळासाठी काम थांबले होते. खंबाटकी घाटावर २ तीन पदरी बोगदे बांधण्याची अंतिम मुदत तीन वर्षांची होती. ती मार्च २०२६ पर्यंत वाढवण्यात आली आहे.
खंबाटकी येथील नवीन रस्ता अंदाजे ६.४६ किलोमीटर लांबीचा आहे. येथे तीन पदरी दुहेरी बोगदे आहेत, डावीकडे १३०७ मीटर लांब आणि उजवीकडे १२२४ मीटर लांब असे दोन बोगदे आहेत. डावीकडे एक व्हायाडक्ट बांधला जात आहे आणि उजवीकडे ९३० मीटर लांब आहे. पुण्याच्या बाजूला बोगदा पूर्ण झाल्यानंतर कालव्यावर एक दरी पूल बांधला जाईल. आता हे काम फक्त १५ टक्के काम बाकी आहे. प्रत्येकी तीन पदरी असलेल्या दोन बोगद्यांचे काम आता ९० टक्क्यांपर्यंत पूर्ण झाले आहे. या बोगद्यांच्या बांधकामामुळे खंबाटकी घाटातून जाण्यासाठी लागणारा वेळ ४५ मिनिटांवरून फक्त ७ मिनिटांवर येईल. यामुळे वेळेची बचत तर होईलच. त्याचसोबत इंधनाचीही बचत होईल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.