GST Cheaper Products : तूप, पनीर, आइस्क्रीम झाले स्वस्त! पुणेकरांनो जाणून घ्या काय आहेत तुमच्या शहरातील नवीन दर

GST News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीएसटी सुधारणा निर्णयामुळे पुण्यातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. तूप, पनीर, बटर, आइस्क्रीम आणि औषधांच्या किमती कमी झाल्या असून घरगुती खर्चात थेट बचत होणार आहे.
GST Cheaper Products : तूप, पनीर, आइस्क्रीम झाले स्वस्त! पुणेकरांनो जाणून घ्या काय आहेत तुमच्या शहरातील नवीन दर
Pune NewsSaam Tv
Published On
Summary
  • जीएसटी २.० सुधारणा लागू झाल्यामुळे घरगुती वस्तू, दुग्धजन्य पदार्थ आणि औषधे स्वस्त झाले आहे.

  • पुणे जिल्हा दूध संघाने पनीर, तूप, आइस्क्रीम आणि बटरचे नवे दर जाहीर केले आहे.

  • औषधांवरील जीएसटी कपातीचा थेट फायदा रुग्णांना मिळणार असून औषधे ५-७% स्वस्त मिळतील.

  • नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्य ग्राहक आणि शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.

अक्षय बडवे, पुणे

जीएसटीमध्ये केलेल्या नव्या सुधारणांच्या बाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी संध्याकाळी देशातील नागरिकांशी संवाद साधला. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाला केलेले संबोधन याआधीही चर्चेत राहिले होते. त्यामुळे मोदींच्या भाषणाकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मोदींनी भाषणातून केंद्र सरकारने जाहीर केलेल्या नेक्स्ट-जनरेशन जीएसटी सुधारणा नवरात्रोत्सवाच्या सुरुवातीपासून म्हणजे आजपासून लागू होणार असल्याची घोषणा केली. भारतात अनेक दशकांपासून भारतातील सामान्य माणूस, व्यापारी वेगवेगळ्या करांच्या जाळ्यात अडकले होते. त्या सर्वांची आपण जीएसटी हा एकच कर लावून मुक्तता केली असल्याचं मोदींनी भाषणात सांगितलं

आता नवीन सुधारणांमुळे कर स्लॅब ५ टक्के आणि १८ टक्के पर्यंत कमी होतील, ज्यामुळे घरगुती वस्तू, गाडी आणि अन्न स्वस्त झालं आहे. मात्र, दुसऱ्या बाजूला, जीएसटी 2.0 मुळे शीतपेये, लक्झरी कार आणि तंबाखूवरील कर वाढले आहेत. या फेरबदलामुळे जीवनावश्यक वस्तू आणि औषधांवरील दर कमी झाले तर, 50 पेक्षा अधिक वस्तू शून्य कर किंवा 0 जीएसटी श्रेणीत आले आहेत. आजपासून सर्वसामान्य नोकरदार आणि मध्यमवर्गीयांसाठी घरगुती आणि दैनंदिन उपयोगातील वस्तू ज्यामध्ये तूप, बटर, आइस्क्रीम यासुद्धा स्वस्त झाल्या आहेत.

GST Cheaper Products : तूप, पनीर, आइस्क्रीम झाले स्वस्त! पुणेकरांनो जाणून घ्या काय आहेत तुमच्या शहरातील नवीन दर
PM Narendra Modi : घर ते टीव्ही, देशात काय झालं स्वस्त? नरेंद्र मोदींनी सगळंच सांगितलं

जीएसटी स्लॅबमध्ये बदल केल्यानंतर, कंपन्या आता थेट ग्राहकांना फायदा देताना दिसत आहेत. तसेच या बदलामुळे शेतकऱ्यांना सुद्धा फायदा होईल असं सांगण्यात येत आहे. सध्या दुग्धजन्य पदार्थ म्हणून सर्वात अधिक खप असलेला पदार्थ म्हणून पनीर ची ओळख आहे आता हेच पनीर एका किलोमागे २० रुपयांनी कमी झाले आहे. दुसऱ्या बाजूला, अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत खाण्यात येणारं आइस्क्रीम एका लिटर मागे २० रुपयांनी कमी झालं आहे.

GST Cheaper Products : तूप, पनीर, आइस्क्रीम झाले स्वस्त! पुणेकरांनो जाणून घ्या काय आहेत तुमच्या शहरातील नवीन दर
GST Reforms: Maruti Suzuki च्या लोकप्रिय कारच्या किंमतीत मोठी घट, ग्राहकांसाठी खरेदी करणे सोपे

या फेरबदलाबाबत पुणे जिल्हा दुध संघाचे अध्यक्ष एड स्वप्नील ढमढेरे म्हणाले, "योग्य आणि चांगला निर्णय झाला आहे. ग्राहकांना कमी दरात दूध आणि दुग्धजन्य पदार्थ मिळणार आहेत. आपला देश हा शेतीप्रधान आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांना न्याय द्यावाच लागतो. त्यामुळे याबाबतचे दर हे नेहमीच परवडणारे पाहिजे या हेतूने सरकार गेल्या अनेक वर्षांपासून काम करत होतं. ज्या लोकांना तूप खाण्याची इच्छा होती ते लोक मात्र जीएसटीमुळे तेलाकडे वळत होते ते आता वळणार नाहीत. दुग्धजन्य पदार्थांच्या विक्रीमध्ये सुद्धा येत्या काळात विक्रमी वाट पाहायला मिळेल. दुग्धजन्य पदार्थांच्या किमती कमी झाल्यामुळे याचा थेट फायदा वितरणावर सुद्धा होणार आहे. कमी दरात उपलब्ध होणाऱ्या या दुग्धजन्य पदार्थ वस्तू हे नागरिकांचे स्वप्न आहे."

GST Cheaper Products : तूप, पनीर, आइस्क्रीम झाले स्वस्त! पुणेकरांनो जाणून घ्या काय आहेत तुमच्या शहरातील नवीन दर
GST Reform: आजपासून नवे दर! काय स्वस्त? काय महाग? वाचा संपूर्ण लिस्ट

पुणे जिल्हा दूध संघाचे व्यवस्थापकीय संचालक मनोज लिमये म्हणाले, "पूर्वीचे जे दर होते त्यामध्ये जीएसटी कमी झाला आहे. पनीर एका किलोच्या मागे २० रुपयांनी कमी झाले आहे तर आइस्क्रीम सुद्धा २० रुपयांनी कमी झाले आहेत तर पनीर चे दर सुद्धा कमी झाले आहेत."

GST Cheaper Products : तूप, पनीर, आइस्क्रीम झाले स्वस्त! पुणेकरांनो जाणून घ्या काय आहेत तुमच्या शहरातील नवीन दर
GST News : GST कपात लाभ एप्रिलपासून! सोमवारपासून नाहीच | VIDEO

पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादन संघाच्या दुग्धजन्य पदार्थांचे काय आहेत जुने आणि नवीन दर

गायीचे तूप (१ लिटर)

जुने दर: ७०० रुपये

नवीन दर: ६६० रुपये

म्हशीचे तूप (अर्धा लिटर)

जुने दर: ३८० रुपये

नवीन दर: ३६० रुपये

पनीर (१ किलो)

जुने दर: ४३० रुपये

नवीन दर: ४१० रुपये

आइस्क्रीम

जुने दर: १८० रुपये

नवीन दर: १६० रुपये

बटर (५०० ग्रॅम)

जुने दर: २९५ रुपये

नवीन दर: २८० रुपये

GST Cheaper Products : तूप, पनीर, आइस्क्रीम झाले स्वस्त! पुणेकरांनो जाणून घ्या काय आहेत तुमच्या शहरातील नवीन दर
GST Reform: नवरात्रोत्सवाचा आनंद वाढणार; दूध, तेल, साबण ते टीव्ही, फ्रीज झालं स्वस्त

औषधे आजपासून स्वस्त, किंमत जुनी असली तरी जीएसटी कपातीचा लाभ रुग्णांच्या खिशात

औषधांवरील वस्तू व सेवाकरात (जीएसटी) कपात केल्यानंतर औषध नियंत्रकांनी कंपन्या आणि वितरकांना सुधारित किमतीत ग्राहकांना औषधे पोहोचविण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानंतर ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ केमिस्ट्स अँड ड्रगिस्ट्स असोसिएशनने औषधविक्रेत्यांनी आजपासून स्वस्त दरात औषधे देण्याचे पाऊल उचलले आहे. त्यामुळे जुनी किंमत असलेली औषधेही नव्या किमतीत मिळणार आहेत. बहुतांश औषधांवरील जीएसटी १२ वरून ५ टक्क्यांवर आणला आहे. वैद्यकीय उपकरणांवरील जीएसटीही आता ५ टक्क्यांवर आणला आहे.

GST Cheaper Products : तूप, पनीर, आइस्क्रीम झाले स्वस्त! पुणेकरांनो जाणून घ्या काय आहेत तुमच्या शहरातील नवीन दर
GST Discount: दसऱ्याला घरी आणा कार; GST कपातीनंतर टाटाच्या या कारवर धमाकेदार डिस्काउंट, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत

ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ केमिस्ट अँड ड्रगिस्ट चे अध्यक्ष जगन्नाथ शिंदे म्हणाले, "जवळपास 33 औषध हे आता शून्य टक्के जीएसटीवर उपलब्ध होणार आहेत यामुळे एकंदरीत औषधांचा विचार केला तर त्यांच्या किमती जवळपास पाच ते सात टक्क्यांनी कमी होणार आहेत. सॉफ्टवेअर मध्ये दुरुस्ती करून नवीन किमतीनुसार औषधे उपलब्ध करून देण्याचा आदेश आणि सूचना या होलसेलर आणि रिटेलर यांना देण्यात आल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com