Crime News: कल्याणात फिल्मी स्टाइलने पिस्तुल तस्कर गजाआड

पोलिसांना घाबरवण्यासाठी झाडल्या गोळ्या ,पोलिसांनी मोठ्या धाडसाने पाठलाग करत आवळल्या मुसक्या...
Crime News
Crime Newsप्रदीप भणगे
Published On

कल्याण - कल्याण बाजारपेठ पोलीस (Police) ठाण्याच्या पथकाने एका पिस्तुल तस्कराला सापळा रचत अटक केली आहे. धक्कादायक म्हणजे पोलीस या तस्करचा पाठलाग करत असताना त्याने पोलिसांना घाबरवण्यासाठी जमिनीच्या दिशेने गोळ्या झाडल्या. मात्र पोलिसांनी जीवाची पर्वा न करता मोठ्या धाडसाने या तस्कराचा पाठलाग करत त्याला पकडलं. सुरज शुक्ला असे या तस्कराचे नाव असून तो मध्यप्रदेश (Madhya Pradesh) येथे राहणारा आहे. त्याच्याकडून 2 पिस्टल 2 मॅगझीन 16 काडतुस जप्त करण्यात आले आहेत. त्याने हे पिस्तुल कुणाला विकण्यासाठी आणले होते आधी किती पिस्तुल विकलेत याचा तपास पोलीस करत आहेत.

हे देखील पहा -

कल्याण बाजारपेठ पोलिसांना एक इसम कल्याण पश्चिमेकडील लाल चौकी परिसरात येणार असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे बाजारपेठ पोलिसांच्या पथकाने आज सकाळच्या सुमारास लाल चौकी परिसरात सापळा रचला. एक इसम संशयास्पद आढळून आल्याने पोलिसांनी त्याला हटकले मात्र या इसमाला संशय आल्याने त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला पोलिसांनी त्याचा पाठलाग सुरु केला.पाठलाग सुरुच असल्याने पोलिसांना घाबरवण्यासाठी या इसमाने आपल्याजवळील पिस्तूलाने जमिनीवर गोळ्या झाडल्या.

मात्र पोलिसांनी न घाबरता काही अंतरावर त्याच्यावर झडप घालत त्याला अटक केली. सुरज शुक्ला असे या तस्कराचे नाव असून तो मध्यप्रदेश येथे राहणारा आहे. त्याच्याकडून 2 पिस्टल 2 मॅगझीन 16 काडतुस जप्त करण्यात आले आहेत. त्याने हे पिस्तुल कुणाला विकण्यासाठी आणले, कुणाकडून आणले,आणखी काही पिस्टल याआधी विक्री केलेत का याबाबत पोलिसांनी तपास सुरु केला आहे.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com