पिंपरी-चिंचवड पोलिसांचा मोठा निर्णय, इतक्या दिवस मनाई आदेश लागू; अटी कोणत्या?

Pimpri Chinchwad police Section 37 order 2026: पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत १६ ते २९ सप्टेंबरदरम्यान मनाई आदेश लागू करण्यात आला आहे. पाच किंवा अधिक व्यक्तींचा जमाव, मोर्चे, मिरवणुका आणि शस्त्र बाळगण्यावर निर्बंध आहेत.
PIMPRI-CHINCHWAD POLICE PROHIBITORY ORDER FROM SEPTEMBER 16 TO 29
PIMPRI-CHINCHWAD POLICE PROHIBITORY ORDER FROM SEPTEMBER 16 TO 29saam tv
Published On

सागर आव्हाड, साम टीव्ही

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ च्या कलम ३७(१)(३) अन्वये १६ सप्टेंबर रोजी ००.०१ वाजेपासून २९ सप्टेंबर रोजी २४.०० वाजेपर्यंत मनाई आदेश लागू करण्यात आला आहे. पोलीस सह आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर यांनी हा आदेश जारी केला आहे.

PIMPRI-CHINCHWAD POLICE PROHIBITORY ORDER FROM SEPTEMBER 16 TO 29
मोठी बातमी! पुण्यात आजपासून जमावबंदी, रील सोशल मीडियावर टाकल्यास कारवाई, पाहा काय सुरू अन् काय बंद?

या कालावधीत विविध सण, उत्सव, जयंती-पुण्यतिथी तसेच २५ सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी असल्याने मोठ्या प्रमाणावर नागरिकांची गर्दी होण्याची शक्यता आहे. तसेच विविध मागण्यांसाठी राजकीय पक्ष, सामाजिक संघटना यांच्या वतीने मोर्चे, धरणे, निदर्शने, उपोषणे, बंद आदी आंदोलने होण्याची शक्यता लक्षात घेऊन हा आदेश देण्यात आला आहे.

PIMPRI-CHINCHWAD POLICE PROHIBITORY ORDER FROM SEPTEMBER 16 TO 29
जरांगे पाटलांचा सरकारला थेट अल्टिमेटम! 'या' १३ मागण्यांसाठी अंतरवाली सराटीत रणांगण, पाहा संपूर्ण यादी

शस्त्रे, ज्वलनशील पदार्थ बाळगण्यास बंदी

मनाई आदेशाच्या कालावधीत दाहक अथवा स्फोटक पदार्थ, ज्वलनशील द्रव पदार्थ, दगड, शस्त्रे-अस्त्रे, फेकण्याची हत्यारे, काचेचे तुकडे किंवा रिकाम्या काचेच्या बाटल्या बाळगणे, जमा करणे अथवा तयार करणे यास मनाई करण्यात आली आहे. तसेच चाकू, सुरा, कोयता, तलवार, भाले, काठ्या, बंदुका किंवा शारीरिक इजा करण्यासाठी वापरता येईल अशा वस्तू सोबत बाळगण्यासही प्रतिबंध आहे.

PIMPRI-CHINCHWAD POLICE PROHIBITORY ORDER FROM SEPTEMBER 16 TO 29
राहुल गांधींच्या पुण्यातील कार्यक्रमाला अखेर परवानगी; पण 'या' ३० अटी-शर्तीचे करावे लागणार पालन

पोलीस आयुक्तांची पूर्वपरवानगी घेतल्याशिवाय पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींचा जमाव करणे, सभा घेणे अथवा मिरवणूक काढणे यासही बंदी घालण्यात आली आहे. तसेच आक्षेपार्ह घोषणा, सभ्यता व नीतिमत्तेला धोका निर्माण करणारी भाषणे किंवा कायदा-सुव्यवस्थेला बाधा आणणारे कृत्य करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com