Pimpri Chinchwad News : हिंजवडीतील 'त्या' होर्डिंग प्रकरणी जागा मालकावर गुन्हा दाखल

Pune Hoarding News : खासदार सुप्रिया सुळे यांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना होर्डिंग्जच्या प्रकरणावर लक्ष घालण्याबाबत सांगितले.
pune, hinjewadi, hoarding collapsed
pune, hinjewadi, hoarding collapsedsaam tv
Published On: 

Hinjewadi Hoarding Collapsed : पिंपरी चिंचवड शहरातील हिंजवडी भागात मंगळवारी झालेल्या पावसामुळे एक मोठी अनुधीकृत होर्डिंग्ज कोसळली होती. ह्या होर्डिंग खाली दबून दोन जण गंभीर जखमी झाले होते. तर तीन-चार वाहनांचा देखील मोठा नुकसान झाला होत. आता या प्रकरणात होर्डिंग्जच्या जागा मालकावर हिंजवडी पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. (Maharashtra News)

pune, hinjewadi, hoarding collapsed
Shivrajyabhishek Sohala 2023 : शिवराज्याभिषेक सोहळयात यंदा 'या' कार्यक्रमांचे आयाेजन; शिरकाई देवी परिसर हर हर महादेवने दुमदुमला

हिंजवडी येथे झालेल्या वादळी पावसात होर्डिंग्ज कोसळले. सुदैवाने येथे काही जिवितहानी झाली नाही. हे होर्डिंग्ज अधिकृत की अनधिकृत याबाबत महापालिकेकडे माहिती उपलब्ध नसल्याचे स्पष्ट झाले आहे. याशिवाय पुणे महापालिका हद्द आणि जिल्ह्यातही काही ठिकाणी यापूर्वी होर्डिंग कोसळले आहेत.

pune, hinjewadi, hoarding collapsed
Rupali Chakankar News : सोशल मीडियावरील अश्लील पेजवर रुपाली चाकणकर यांचा फोटो अपलोड, सायबर सेलने घेतली गंभीर दखल

पुणे आणि परिसरात यापुर्वी होर्डिंग्ज कोसळून काही नागरीकांचा मृत्यू झाल्याच्या घटना देखील घडल्या आहेत. हे लक्षात घेता पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी लक्ष घालावे अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विटद्वारे नुकतीच केली आहे.

pune, hinjewadi, hoarding collapsed
Mumbai Goa Highway News : वाहतुकदारांनाे ! मुंबई गोवा महामार्गावर चार दिवस अवजड वाहनांना बंदी; जाणून घ्या कारण

जागा मालकावर गुन्हा दाखल

दरम्यान आता या प्रकरणात होर्डिंग्जच्या जागा मालकावर अखेर हिंजवडी पोलिसांत गुन्हा नोंदविला आहे. राजेंद्र निवृत्ती साखरे असे गुन्हा दाखल झालेल्या जागा मालकाचे नाव आहे. या जागा मालकाला होर्डींग्जच स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना दिल्या गेल्या होत्या, मात्र त्यांनी सूचनांचे पाल केले नाही. त्याशिवाय अनधिकृत होर्डिंग्ज असल्याचा ठपका ठेवत या जागा मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.