Pimpri-Chinchwad News: पिंपरी-चिंचवडमध्ये मोठी दुर्घटना, पाण्याची टाकी कोसळून ३ कामगारांचा मृत्यू; पाहा थरकाप उडवणारा VIDEO

Water Tank Collapsed In Pimpari Chinchwad: पिंपरी-चिंचवडच्या भोसरी परिरामध्ये पाण्याची टाकी कोसळली. या दुर्घटनेत ३ कामगारांचा मृत्यू झाला.
Pimpri-Chinchwad News: पिंपरी-चिंचवडमध्ये मोठी दुर्घटना, पाण्याची टाकी कोसळून ५ कामगारांचा मृत्यू
Water Tank Collapsed In Pimpari ChinchwadSaam Tv
Published On

गोपाळ मोटघरे, पिंपरी-चिंचवड

पिंपरी-चिंचवडमध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. पाण्याची टाकी कोसळून ३ कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. भोसरीच्या सद्गुरू नगर येथे ही धक्कादायक घटना घडली आहे. लेबर कॅम्पमध्ये राहणाऱ्या कामगारांवर ही पाण्याची टाकी कोसळली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. याप्रकरणाचा तपास सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भोसरी सद्गुरूनगरला सकाळी सातच्या सुमारास ही घटना घडली. बिल्डरने तात्पुरत्या स्वरूपात बांधलेली पाण्याची टाकी कोसळून ३ बिगारी कामगारांचा जागीच मृत्यू झाला. तर ७ ते ८ जण गंभीर जखमी झाले आहेत त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिस आणि पालिकेच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे.

पाण्याची टाकी जमिनीपासून १२ फूट उंचीवर होती. नवीनच बांधकाम होते. त्यात पाणी भरले होते. सकाळी हे कामगार कामाला जाण्यासाठी आंघोळ करण्यासाठी टाकीजवळील नळावर आले होते. अचानक टाकी फुटली आणि त्याखाली आंघोळ करण्यास आलेले कामगार अडकले. यामध्ये ३ जणांचा मृत्यू झाला. तर ७ ते ८ जण जखमी झाले. या कॅम्पमध्ये बिहार, ओरिसा, झारखंड, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेशसह इतर राज्यातील सुमारे १००० ते १२०० कामगार राहत आहेत. काही कामगार चार-पाच दिवसांपूर्वीही येथे कामासाठी आलेले आहेत.

लांडेवाडीमध्ये एन सी सी एल आदानी ग्रुपचे काम सुरू आहे. त्या ठिकाणी हे कामगार काम करत होते. सकाळी ८ वाजता येथून ते कामाला जाण्यासाठी निघतात. त्यामुळे ते अंघोळीसाठी पाण्याच्या टाकीजवळ आले होते. या ठिकाणी या कामगारासाठी एकाच वेळेस २० ते २५ कामगारांच्या आंघोळीची सोय करण्यात आली होती. त्याचप्रमाणे ६० मोबाईल स्वच्छतागृहसुद्धा येथे उभारण्यात आले होते. सकाळी घटना घडली त्यावेळेस त्या ठिकाणी २० ते २५ कामगार आंघोळीसाठी आले होते.

Pimpri-Chinchwad News: पिंपरी-चिंचवडमध्ये मोठी दुर्घटना, पाण्याची टाकी कोसळून ५ कामगारांचा मृत्यू
Pune Crime: हृदयद्रावक! आधी फासावर लटकवलं, नंतर श्वानावर गोळ्या झाडल्या; पुण्यातील धक्कादायक प्रकार

कामगार अंघोळ करत असताना अचानक टाकी फुटली आणि त्यांच्या अंगावर पडली. या दुर्घटनेत ३ कामगारांचा मृत्यू तर काहीजण गंभीर जखमी झाले आहेत. घटनास्थळावर लवकरच रुग्णवाहिका पोहचू शकल्या नाहीत त्यामुळे स्थानिक कामगारांनी जखमींना नजीकच्या रुग्णालयात दाखल केले. शासकीय मदत तातडीने न मिळाल्यामुळे येथील कामगारांनी संताप व्यक्त केला. महत्वाचे म्हणजे ज्या ठिकाणी लेबर कॅम्प उभारले आहे ही जागा रेड झोनमध्ये येत आहे.

Pimpri-Chinchwad News: पिंपरी-चिंचवडमध्ये मोठी दुर्घटना, पाण्याची टाकी कोसळून ५ कामगारांचा मृत्यू
Ambernath Crime : भररस्त्यात धारदार शस्त्राने वार करत इस्टेट एजंटची हत्या; घटनेनं अंबरनाथमध्ये खळबळ

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com