Maharashtra Politics : मोठी बातमी! शेतकरी कामगार पक्षाकडून ४ उमेदवार जाहीर, कुणाला मिळाली उमेदवारी? वाचा

PWP Party jayant patil News :शेतकरी कामगार पक्षाने रायगडमध्ये ४ उमेदवार जाहीर केले आहेत. शेकापने उमेदवार जाहीर केल्यानंतर मोठं शक्तिप्रदर्शन केलं.
मोठी बातमी! शेतकरी कामगार पक्षाकडून ४ उमेदवार जाहीर, कुणाला मिळाली उमेदवारी? वाचा
Maharashtra Politics :Saam tv
Published On

सचिन कदम, साम टीव्ही प्रतिनिधी

रायगड : राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. एकीकडे महाविकास आघाडीची जागावाटपाचा चर्चा सुरु असताना शेतकरी कामगार पक्षाने त्यांचे उमेदवार जाहीर केले आहेत. महाविकास आघाडीतील प्रमुख पक्षाने उमेदवारांची यादी जाहीर करण्याआधीच शेतकरी कामगार पक्षाने त्यांचे ४ उमेदवार जाहीर केले आहेत. शेतकरी कामगार पक्षाने अलिबाग, पनवेल, उरण, पेणमध्ये उमेदवारी जाहीर केले आहेत. शेतकरी कामगार पक्ष हा महाविकास आघाडीत आहे.

शेतकरी कामगार पक्षाने अलिबाग, पनवेल, उरण, पेण मतदारसंघातून उमेदवार जाहीर केल्याची माहिती मिळाली आहे. या चारही मतदारसंघात पक्षाचे सरचिटणीस जयंत पाटील यांनी उमेदवारीची घोषणा केली आहे. शेकापने अलिबागमध्ये मेळाव्यात जोरदार शक्ती प्रदर्शन करत चार उमेदवारांची घोषणा केली. शेतकरी कामगार पक्षाने उमेदवारी जाहीर केल्यानंतर कार्यकर्त्यांचं मोठं शक्तिपर्दशन केल्याचं दिसून आलं. या मेळाव्याला मोठ्या प्रमाणात महिलांची संख्या पाहायला मिळाली.

मोठी बातमी! शेतकरी कामगार पक्षाकडून ४ उमेदवार जाहीर, कुणाला मिळाली उमेदवारी? वाचा
Jayant Patil Shekap News | अजित पवार आणि इतर नेते तिकडे का गेले हे त्यांनाच विचारायला हवं

दरम्यान, शेतकरी कामगार पक्षाने रायगड जिल्ह्यातील ४ उमेदवार जाहीर केले आहेत. तर सोलापुरातील सांगोला विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांशी उद्या चर्चा करून पक्षातील वरिष्ठ नेते उमेदवार ठरवणार असल्याची माहिती हाती आली आहे. सांगोल्यात शेकापकडून बाबासाहेब देशमुख इच्छुक आहेत.

शेतकरी कामगार पक्ष हा महाविकास आघाडीतील पक्ष आहे. २०१९ साली विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या महेंद्र दळवी यांनी शेकापच्या पंडित पाटील उर्फ सुभाष पाटील यांचा पराभव केला होता. तर शेकापच्या बालेकिल्ल्यात शेकापकडे प्रतिनिधित्व नसल्याने २०१९ साली झालेला पराभव शेकाप कार्यकर्त्यांच्या जिव्हारी लागला होता. त्यानंतर आता शेकापच्या बालेकिल्ल्यात चित्रलेखा पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

मोठी बातमी! शेतकरी कामगार पक्षाकडून ४ उमेदवार जाहीर, कुणाला मिळाली उमेदवारी? वाचा
Sangola Vidhan Sabha : राष्ट्रवादीचे सोलापूर जिल्हाध्यक्षांची सांगोल्यातून अपक्ष उमेदवारी; आमदार शहाजी बापू पाटील यांना धक्का VIDEO

शेकापचे रायगडमधील उमेदवार

1)अलिबाग - चित्रलेखा पाटील

2) पनवेल - बाळाराम पाटील

3) उरण - प्रितम पाटील

4) पेण - अतुल म्हात्रे

5) लोहा खंदार - शामसुंदर शिंदे

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com