

पिंपरी चिंचवडमध्ये एका जलतरण तलावात एक धक्कादायक घटना घडली. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या कासारवाडी येथील जलतरण तलावात क्लोरीन गॅस लिकेज झाला. यामुळे पोहण्यासाठी आलेल्या २०- २२ जणांना श्वसनाचा त्रास जाणवू लागला. या गॅस लिकीजमुळे परिसरातील नागरिकांनाही त्रास जाणवत आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, कासारवाडी (Kasarwadi) येथील जलतरण तलावात क्लोरीन गॅस लिकेज झाला. आज (मंगळवार, १० ऑक्टोंबर) सकाळी ही धक्कादायक घटना घडली. या गॅस लिकेजमुळे पोहण्यासाठी आलेल्या 20 ते 22 जणांना श्वास घेण्यास त्रास झाला.
तसेच परिसरात क्लोरीन गॅस पसरल्याने काही मीटर पर्यंत नागरिकांना खोकला आणि गळ्याचा त्रास, श्वास घेण्यास त्रास होत होता. या घटनेनंतर कासारवाडी येथील स्विमिंग पूलाच्या समोरून वाहतूक बंद करण्यात आली आहे.
याबाबतची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दल पोलीस दाखल झाले आहे. तसेच त्रास होत असलेल्या 11 लोकांना उपचारासाठी महापालिका वायसीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेने परिसरातन काही काळ नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पाहायला मिळाले. (Latest Marathi News)
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.