पिंपरी चिंचवड महापालिकेच्या मालमत्ता कर संकलन विभागाने वर्ष 2023- 24 या आर्थिक वर्ष दरम्यान जवळपास 977 कोटी 50 लाख रुपयाची विक्रमी अशी मालमत्ता कर वसुली केली आहे. दरम्यान पिंपरी चिंचवड महापालिकेने महावितरणची माेठी थकबाकी ठेवल्याने लोका सांगे ब्रह्मज्ञान स्वतः कोरडे पाषाण असे महापालिकेचे झाल्याची चर्चा सुरु आहे. (Maharashtra News)
मालमत्ता कर थकबाकी आणि मालमत्ता कर वसुलीसाठी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या कर संकलन विभागाने अतिशय टोकाचे पाऊल उचलले होते. ज्यात नागरिकांच्या घरांचे पाणीपुरवठा खंडित करणे, मालमत्ता जप्त करून मालमत्तेसाठी लिलाव करण्याचा निर्णय देखील कर संकलन विभागाने घेतला होता. त्यानूसार कार्यवाही देखील केली.
पिंपरी चिंचवड शहरातील कर बुडव्या नागरिकांकडून अतिशय कठोर पद्धतीने करवसुली करणाऱ्या पिंपरी चिंचवड महापालिकेने स्वतः महावितरणचे एक कोटी 11 लाख रुपये थकविले आहेत.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वेगवेगळ्या ८४० कार्यालयाकडे महावितरणचे जवळपास एक कोटी 11 लाख रुपये थकबाकी आहेत. स्वतः थकबाकी ठेऊन दुसऱ्याकडे थकबाकीचे पैसे वसूल करणाऱ्या महापालिकेच्या कारभारावर शहरातील नागरिकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.