Pimpari-Chinchwad: पिंपरीत मॅनहोलमध्ये २ कामगारांचा मृत्यू, गेल्या वर्षी इथेच तिघांचा झाला होता मृत्यू

Pimpri Chinchwad 2 Workers Die In Manhole: पिंपरी-चिंचवडमध्ये दोन जणांचा मॅनहोलमध्ये मृत्यू झाला. सफाईचे काम सुरू असताना गुदमरून दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
Pimpari-Chinchwad: पिंपरीत मॅनहोलमध्ये २ कामगारांचा मृत्यू, गेल्या वर्षी इथेच तिघांचा झाला होता मृत्यू
Pimpari-Chinchwad News Saam Tv
Published On
  • पिंपरी- चिंचवडमध्ये मॅनहोलने घेतला दोघांचा जीव

  • निगडीमध्ये भूमिगत डक्टमध्ये दोन कामगारांचा मृत्यू

  • सफाईचे काम करताना गुदमरून झाला मृत्यू

  • गेल्या वर्षी याच ठिकाणी तीन कामगारांचा मृत्यू झाला होता

गोपाळ मोटघरे, पिंपरी-चिंचवड

पिंपरी-चिंचवड शहरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. निगडी परिसरातील भूमिगत डक्टमध्ये काम करत असताना गुदमरल्याने २ कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. धक्कादायक बाब म्हणजे, १५ ऑगस्ट २०२५ रोजी याच परिसरातील ३ कंत्राटी कामगारांचा गुदमरून मृत्यू झाला होता. आता पुन्हा त्याच ठिकाणी दोन कामगारांचा मृत्यू झाल्याने कामगारांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे.

पिंपरी-चिंचवडमधील निगडी परिसरात भूमिगत डक्टमध्ये काम करण्यासाठी उतरलेल्या दोन कामगारांचा गुदमरून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. अमोल शिंदे, (२० वर्षे) आणि मनोज शिंदे (२६ वर्षे) अशी मृत कामगारांची नावे आहेत. दोघेही तरुण कामगार होते. या दुर्घटनेनंतर संबंधित यंत्रणांच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. कारण, गेल्या वर्षी याच ठिकाणी बीएसएनएलच्या ऑप्टिकल फायबर केबलचे काम करणाऱ्या तीन कंत्राटी कामगारांचा विषारी वायूमुळे गुदमरून मृत्यू झाला होता. त्यावेळी डक्टमध्ये उतरण्यापूर्वी आवश्यक खबरदारी घेतली नसल्याचा मुद्दा समोर आला होता.

Pimpari-Chinchwad: पिंपरीत मॅनहोलमध्ये २ कामगारांचा मृत्यू, गेल्या वर्षी इथेच तिघांचा झाला होता मृत्यू
Pimpari- Chinchwad: पुण्यात AI चे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याची आत्महत्या, सीट बेल्टच्या सहाय्याने घेतला गळफास

वर्षभरात याच ठिकाणी घडलेल्या दोन दुर्घटनांमध्ये आतापर्यंत ५ कामगारांचा बळी गेल्याचा दावा करण्यात येत आहे. पहिल्या दुर्घटनेनंतर नेमक्या कोणत्या सुरक्षा उपाययोजना करण्यात आल्या? कामगारांना सुरक्षेची आवश्यक साधने देण्यात आली होती का? डक्टमधील विषारी वायूची तपासणी करण्यात आली होती का? आणि देखरेखीसाठी जबाबदार अधिकारी कोण होते? असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत. या दुर्घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यासह मृत कामगारांच्या कुटुंबीयांना तातडीने आर्थिक मदत देण्याची मागणी होत आहे.या घटने नंतर स्थानिक नागरिकांचा रोष पहायला मिळत असून याची सखोल चौकशी करण्याची मागणी होत आहे.

Pimpari-Chinchwad: पिंपरीत मॅनहोलमध्ये २ कामगारांचा मृत्यू, गेल्या वर्षी इथेच तिघांचा झाला होता मृत्यू
Pimpari-Chinchwad: पिंपरी-चिंचवडकरांसाठी अत्यंत महत्वाची बातमी, १४ दिवसांसाठी जमावबंदी; काय सुरू अन् काय बंद?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com