Pimpri Chinchwad News: ह्रदयद्रावक! वॉटर पार्कमध्ये बुडून ६ वर्षीय चिमुकलीचा मृत्यू; दोघांवर गुन्हा दाखल

Ravet News: या प्रकरणाची फिर्याद स्वतः पोलिसांनी दिल्याने आरोपींना अटक केली जाणार की नाही? याकडे सगळ्यांचे लक्ष लागल आहे.
Pimpari Chinchwad News
Pimpari Chinchwad NewsSaamtv

Pimpri Chinchad News: पिंपरी चिंचवड शहरातून एक दुर्देवी घटना समोर आली आहे. पिंपरी चिंचवड शहरातील रावेत पोलिस स्टेशनच्या हद्दीतील एका वॉटर पार्कमध्ये बुडून सहा वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाला. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. (Ravet Police Station News)

Pimpari Chinchwad News
Shrirampur Bandh : अखेर कृती समितीने दिली येत्या शनिवारी श्रीरामपूर बंदची हाक; जाणून घ्या कारण

याबाबत अधिक माहिती अशी की, पिंपरी चिंचवडच्या (Pimpri Chinchwad) नामांकित सेंटोसा हॉटेल मध्ये असलेल्या वॉटर पार्क मध्ये बुडून एका सहा वर्षे चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. रावेत पोलिस स्टेशन हद्दीत घडलेल्या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.

या प्रकरणात रावेत पोलिसांनी सेंटोसा हॉटेल मालक अजय हरीलाला हिंदुजा आणि हॉटेल व्यवस्थापक राहुल आबा मोरे यांच्याविरुद्ध निष्काळजीपणा करत मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. (Latest Marathi News)

Pimpari Chinchwad News
Tanaji Sawant News : तानाजी सावंतांमुळे पाेलिस यंत्रणा नरमली, राष्ट्रवादीच्या माजी आमदाराचा गंभीर आराेप; आराेग्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी

दरम्यान, या प्रकरणात सेंटोसा हॉटेलमधील स्विमिंग पुलाला सुरक्षा कठडे नसणे लाइफ गार्ड उपस्थित नसणे आणि हयगई केल्या प्रकरणी हे गुन्हा दाखल करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे या प्रकरणाची फिर्याद स्वतः पोलिसांनी दिल्याने आरोपींना अटक केली जाणार की नाही? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com