Tanaji Sawant News : तानाजी सावंतांमुळे पाेलिस यंत्रणा नरमली, राष्ट्रवादीच्या माजी आमदाराचा गंभीर आराेप; आराेग्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी

मंत्रालयापर्यंत धडक मारणार असल्याचे माेटे यांनी स्पष्ट केले.
Tanaji Sawant
Tanaji SawantSaam tv
Published On

- बालाजी सुरवसे

Dharashiv News : आरोग्यमंत्री तानाजी सावंत (health minister tanaji sawant) यांच्या दबावामुळे पाेलिस खातं नरमलं आहे. परिणामी गुंडांची भूम परांडा वाशी मतदारसंघात दहशत वाढू लागली आहे असा आराेप राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार राहुल मोटे (former mla rahul mote) यांनी आज (गुरुवार) पत्रकार परिषदेत मंत्री तानाजी सावंत यांच्यावर केला. माेटे यांनी मंत्री सावंत यांच्या राजीनाम्याची मागणी देखील केली आहे. (Maharashtra News)

Tanaji Sawant
Saam Impact : पालिकेने केली चंद्रभागा नदी चकाचक, नागरिकांसह भाविकांत समाधान

माजी आमदार राहूल माेटे म्हणाले पालकमंत्री तानाजी सावंत यांचा पोलीस खाते व इतर खात्यात हस्तक्षेप वाढला आहे. त्यामुळे भूम परांडा वाशी मतदारसंघात दहशत वाढत आहे. पवनचक्की चालकांना धमक्या देण्याचे प्रकार वाढल्याचे देखील माेटे यांनी नमूद केले. यावेळी त्यांनी विविध घटनांचे दाखल देत मंत्री तानाजी सावंत यांच्या राजीनाम्याची मागणी केली.

Tanaji Sawant
Pune School Reopen: पुण्यात शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांवर कटू प्रसंग, फी न भरल्याने व्यवस्थापनाने दाखविला बाहेरचा रस्ता

माजी आमदार राहूल माेटे म्हणाले भूम-परंडा-वाशी मतदारसंघाचा बिहार झाला आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती पदाधिकारी निवडीवेळी सोलापूर जिल्ह्यातील उजनी येथे घडलेल्या घटनेत तानाजी सावंत यांच्या दबावापोटी पोलिसांनी योग्य कलम लावले नाहीत.

Tanaji Sawant
School Reopen : ए आई मला शाळेत जाऊ दे... नाशकात पालकांचा मुलांसह शाळेच्या बाहेर ठिय्या, निरागस बालकांनी रस्त्यावरच बसून खाल्ला टिफिन

त्यामुळे गुंडांचा आत्मविश्वास वाढत आहे. यामुळेच 12 जुनला ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यावर सावंत यांच्या बॉडिगार्डकडून हल्ला झाल्याचा आरोप देखील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी आमदार राहुल मोटे यांनी केला आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या भेट घेणार असल्याचे माेटे यांनी नमूद केले. या भेटीत मंत्री तानाजी सावंत यांच्या राजीनाम्याची मागणी करणार असल्याचे मोटे यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com