Pandharpur News : लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेली चंद्रभागा नदी घाणीच्या विळख्यात सापडली आहे असे वृत्त साम टीव्हीने प्रसारित केल्यानंतर खडबडून जागी झालेल्या पंढरपूर पालिकेने चंद्रभागा नदी स्वच्छता माेहिम (cleanliness drive of chandrabhaga river in pandharpur) राबवली. पालिकेच्या 40 कर्मचाऱ्यांनी एकाच दिवसात स्वच्छता करून सुमारे 48 टन कचरा गोळा केला आहे. आषाढी यात्रेच्या (Ashadhi Wari 2023) निमित्ताने पंढरपुरात चंद्रभागा नदीची (chandrabhaga river) स्वच्छता झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. (Maharashtra News)
लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेली चंद्रभागा नदी घाणीच्या विळख्यात सापडल्याने नदीपात्रातील पाण्याला दुर्घंधी सुटली आहे. या घाण पाण्यातच भाविकांना पवित्र स्नान करावे लागत असल्याने त्यांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे असे वृत्त साम टीव्हीने प्रसारित केले. त्यानंतर पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पंढरपुरचा दाैरा करुन नदीपात्रातील स्वच्छतेच्या कामाकडे लक्ष द्यावे अशी सूचना प्रशासनास केली.
साम टीव्हीच्या बातमीची दखल घेत (saam tv impact) तसेच पालकमंत्री विखे पाटील यांचे निर्देशाचे पालन करत पंढरपूर पालिकेने चंद्रभागा नदी स्वच्छतेचे काम तातडीने हाती घेतले. आषाढी यात्रे दरम्यान दररोज नदी पात्रातील स्वच्छतेसाठी जादा सफाई कर्मचाऱ्यांची नियुक्ती देखील केली.
पंढरपुरात सफाई कर्मचाऱ्यांचे आंदोलन
ऐन आषाढी एकादशीच्या (Ashadhi Ekadashi 2023) तोंडावर पालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांनी सरकारच्या विरोधात आंदोलन पुकारले आहे. पालिकेचा सुमारे 300 हून अधिक सफाई कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन सुरू केल्यामुळे शहरात ठिकठिकणी कच-याचे ढीग साचले आहेत.
येथील सफाई कर्मचाऱ्यांना कायम स्वरुपी राहती घरे मिळावीत, अनुकंपाखाली वारसांना नोकरी मिळावी, एक तारखेला वेतन मिळावे यासह विविध प्रमुख मागणीसाठी कर्मचाऱ्यांनी हे आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाचा आज पंधरा दिवस आहे.
त्यामुळे गेल्या पंधरा दिवसांपासून शहरातील स्वच्छतेची कामे ठप्प झाली आहेत. जो पर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेतले जाणार नाही असा इशारा कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष गुरू दोडिया यांनी सरकारला दिला आहे.
Edited By : Siddharth Latkar
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.